त्र्यंबकेश्वर मंदिराचा दक्षिण दरवाजा मंत्र्यांचा 'सेल्फी पॉंईंट' 

नाशिकला गेल्या काही दिवस राजकीय नेते, मंत्र्यांची वर्दळ वाढली आहे. याने नागरिकांची कामे किंवा शहराचे खुप प्रश्‍न सुटले असतील, असा जर समज करुन घेत असाल तर थोडं दमान घ्या. कारण नेते, मंत्री येतात. शासकीय बैठका घेतात. आधी देवदर्शन करतात. यामध्ये सगळ्यांचा ओढा असतो त्र्यंबकेश्‍वर मंदीर. या मंदिराचे दक्षिणद्वार तर चक्क मंत्र्यांचे सेल्फी पॉंईंट बनला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराचा दक्षिण दरवाजा मंत्र्यांचा 'सेल्फी पॉंईंट' 

नाशिक : नाशिकला गेल्या काही दिवस राजकीय नेते, मंत्र्यांची वर्दळ वाढली आहे. याने नागरिकांची कामे किंवा शहराचे खुप प्रश्‍न सुटले असतील, असा जर समज करुन घेत असाल तर थोडं दमान घ्या. कारण नेते, मंत्री येतात. शासकीय बैठका घेतात. आधी देवदर्शन करतात. यामध्ये सगळ्यांचा ओढा असतो त्र्यंबकेश्‍वर मंदीर. या मंदिराचे दक्षिणद्वार तर चक्क मंत्र्यांचे सेल्फी पॉंईंट बनला आहे.

भारतीय राज्यघटना, प्रशासकीय प्रणाली यामध्ये धार्मिकतेला स्थान नाही. मंत्री, अधिकारी यांचे दौरे शासकीय असल्याने त्यात तर खासगी कामांना स्थान नसावेच असे संकेत आहेत. त्यामुळे अनेक जाणते नेते, लोकप्रतिनिधी शासकीय दौऱ्यावर असल्यावर या गोष्टी कटाक्षाने टाळत असत. सध्या मात्र शासकीय दौऱ्यांत देवदर्शनाचा प्रघातच पडला आहे. किंबहुन अनेक दौरे केवळ देवदर्शनासाठीच असतात की काय अशी स्थिती असते. 

सोमवारी चार मंत्री नाशिक दौऱ्यावर होते. यातील तीन मंत्र्यांनी त्र्यंबकेश्‍वर मंदिराला भेट दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या देवदर्शनाला जरा जास्तच वेळ लागल्याने विभागीय आढावा बैठकीला विलंब झाला. त्यामुळे बैठकीसाठी आलेले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ताटकळले. शेवटी जास्तच विलंब झाल्याने ते बैठकीला न थाबंता निघुन गेले. त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटींवार, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही त्र्यंबकेश्‍वर मंदीरात पुजा व अभिषेक केला.

यामध्ये स्थानिक अधिकारी, प्रशासनालाही व्यवस्था करावी लागते. येथील तहसीलदार महेंद्र पवार या दौऱ्यांमुळे नेहेमीच 'अॅलर्ट' असतात. यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना स्वागताची संधी मिळते. नेतेही खुश होतात एव्हढीच जमेची बाजु. यामध्ये महत्वाच्या व्यक्ती, मंत्र्यांना मंदिरात नेण्यासाठी मंदिराच्या दक्षिण दरवाजाचा वापर सुरु करण्यात आला आहे. मंत्र्यांसमवेत कार्यकर्ते, राजकीय पदाधिकाऱ्यांची गर्दीही असते. 

बाहेर येताना मंत्री, त्यांचे आप्त, कुटुंबीय मंदिराच्या या दरवाजात सेल्फी काढतात. सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनाही छायाचित्राचा मोह होतो. त्यामुळे दहा पंधरा मिनिटे ही गर्दी दक्षिण दरवाजात घुटमळते. त्यामुळे सध्या हे मंदिर आणि मंदिराचा दक्षिण दरवाजा मंत्र्यांचा सेल्फी पॉंईंट झाला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी एव्हढी गर्दी झाली होती की सुरक्षा रक्षकांचीही धावपळ उडलाही होती. त्यामुळे मंत्र्यांच्या सेल्फीची चर्चा सध्या जोरात आहे. 

कुशावर्त स्वच्छ करु - मुनगंटीवार 
त्रंबकेश्वर येथे दर्शनास आलेल्या अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी कुशावर्त तीर्थाच्या पाण्याच्या स्वच्छतेविषयी त्यांच्याशी चर्चा केली. 'निरी' च्या निधीतुन त्याची व्यवस्था करु, ब्रम्हगिरी पर्वत सतत हिरवा राहावा यासाठी अनुषंगिक वृक्ष लागवड व संवर्धन करु असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com