tribute to babasaheb ambedkar dadar | Sarkarnama

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर लोटला 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आज जनसागर लोटला. 

दादर येथील चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करता यावे, म्हणून राज्यासह देशभरातून अनुयायींनी बुधवारपासूनच रीघ लावली आहे. 
राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. 

देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी (दादर) दाखल झाले आहे. आज दादर आणि शिवाजीपार्कपरिसर निळाईने फुलून गेला होता. शिवाजीपार्कवर पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. 

दरम्यान, दादरचे नामांतर करून चैत्यभूमी करावे या मागणीसाठी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दादर रेल्वे स्टेशनवर आंदोलन केले. दादर नाव पुसून ते चैत्यभूमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ येथे गोंधळ झाला. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, की दादर या नावाला एैतिहासिक वारसा आहे. ते अस्मीतेचे प्रतिक असल्याने दादरचे चैत्यभूमी करण्यास आपला विरोध असल्याचे म्हटले आहे.  

संबंधित लेख