tribute to anna bhau sathe ramdas athawale | Sarkarnama

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्नशील : रामदास आठवले 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान असल्याने त्यांच्या कर्तृत्वाचा भारतरत्न किताबाने मरणोत्तर गौरव व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आठवले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आठवले यांनी म्हटले आहे, की अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईत तसेच त्यांच्या वाटेगावी (जि.सांगली) जागतिक दर्जाचे स्मारक उभारावे यासाठी आपण प्रयत्नशील आहेत. जग बदल घालुनी घाव सांगून गेले आम्हा भीमराव ही काव्यपंक्ती लिहून अण्णाभाऊ साठे यांनी मातंग समाजसह सर्व वंचित समाज घटकाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार आणि त्यासाठी सनदशीर मार्गाने संघर्ष करण्याचा विचार मांडला आहे. मातंग आणि बौद्ध समाजसह सर्व वंचित समाजघटकांची निळ्या झेंड्याखाली एकजूट होणे हीच खरी त्यांच्या जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख