Trasport Strike on 20th July | Sarkarnama

20 जुलैला वाहतुकदारांचा देशव्यापी चक्का जाम: प्रकाश गवळी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 जुलै 2018

सरकारच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. तीच वेळ वाहतूकदारांवर येऊ देऊ नका. आमच्या मागण्या बाबत विचार केला नाही तर वहातुकदारांच्या वतीने २० जुलैला देशभर चक्का जाम आंदोलन करणार आहोत - वाहतूकदार संघटना

सातारा : ''वाहतूकदाराच्या विविध समस्याकडे देशातील भाजप सरकार दुर्लक्ष करीत आहे. वाहतूक व्यवसाय हा देशाच्या अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. नोटबंदी, जीएसटी, ई वेब अंमलबजावणीत सरकारसोबत राहिलो. आमच्या मागण्याबाबत अनेकदा केंद्र सरकार कडे गेलो होतो. तरीही प्रतिसाद मिळाला नाही. सरकारच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. तीच वेळ वाहतूकदारांवर येऊ देऊ नका. आमच्या मागण्या बाबत विचार केला नाही तर वहातुकदारांच्या वतीने २० जुलैला देशभर चक्का जाम आंदोलन करणार  आहोत,''  असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान देशातील ९३ लाख आणि महाराष्ट्रातील १८ लाख वाहने आंदोलनात सहभागी होतील, असेही गवळी यांनी स्पस्ट केले.

प्रकाश गवळी  म्हणाले, "आंतरराष्ट्रीय पातळीवर डिझेल च्या किंमती कमी असताना हे सरकार डिझेल दर कमी करत नाही. डिझेल दर वाढीमुळे व्यवसाय बंद पडू लागले आहेत.  दररोज दरवाढ होत असल्याने मोठे नुकसान होत आहे. महाराष्ट्र प्रवेश कर जादा असल्याने दर अन्य राजपेक्षा दर जादा आहेत. आम्ही 130 कोटी कर सरकारला देतो. तरीही वहातुकदारांना सवलती मिळत नाहीत. समस्या व्यवसायांच्या सहनशीलतेच्या पलिकडे गेल्या आहेत. हे सरकार जुलमी आहे. टोल सुरू झाला होता. तेव्हापासून आम्ही सुविधासाठी भांडत आहेत. चार पदरी रस्ते झाले. परंतु त्या रस्त्यावर कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. वाहनांकडून टोल वसुली केली जाते सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत."

या वेळी  वाहतूकदार संघटनाचे पदाधिकारी अविनाश कदम, बस संघटनेचे अध्यक्ष जगनशेठ जाधव, धनंजय कुलकर्णी, अस्लम शेठ कुरेशी, टेम्पो संघटनेचे निलेश शिंदे, राहूल  महाडिक, सचिन कोठावळे आदी उपस्थित होते.

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख