transfers | Sarkarnama

बदल्यांच्या लॉबिंगसाठी अधिकाऱ्यांची विधानभवनात गर्दी

गोविंद तुपे
शनिवार, 20 मे 2017

मुंबई : सर्व विभागांच्या नियमित बदल्यांच्या हंगामात विधानसभेचे होत असलेले विशेष अधिवेशन हे अधिकाऱ्यांसाठी सुवर्णसंधी असल्याची चर्चा अधिकारी वर्गात रंगली आहे.

एरवीही मे-जून महिन्यात होणाऱ्या बदल्यांमध्ये आवश्‍यक त्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी मंत्री, पीएस आणि सचिव यांचा समन्वय साधण्यासाठी वाट पहात बसण्याची वेळ यायची.

मात्र बदली संदर्भातील सर्वच यंत्रणा एकाच ठिकाणी योग्य वेळी भेटल्याने बदलीसाठी प्रयत्न करणाऱ्या बऱ्याच अधिकाऱ्यांनी शासकीय कामाच्या निमित्ताने किंवा रजा टाकून विधानभवन गाठले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

क्रीम ठिकाणी पोस्टिंग करून घेण्यासाठी अधिकारी वेगवेगळ्या मार्गाचा वापर करीत असतात. त्यामध्ये आर्थिक  व्यवहारापासून ते मंत्र्याच्या निकटवर्तीयांमार्फत लॉबिंग करण्याची एकही संधी अधिकारी सोडत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहेत.

विशेष म्हणजे काही वजनदार मंत्र्यांच्या आणि पालकमंत्र्यांची शिफारस पत्रे मिळविण्यासाठीही कित्येक अधिकारी प्रयत्नशील असल्याचे चित्र विधानभवनातील मंत्र्यांच्या दालनात पहायला मिळत आहे. मंत्र्यांचा निकटवर्तीय कोण आहे, कोण आपले बदलीचे काम करून देईल याबाबतही काहीजण चाचपणी करत असल्याचे पहायला मिळत आहे.

आपले एवढे काम करा तुमचे काय असेल ते आपण करून देऊ हा डायलॉग मंत्रालयातील कॅंन्टीन पासून ते सर्वत्र सर्रास ऐकायला मिळत आहे. एरव्ही जर एखाद्या अधिकाऱ्याला टाळायचे असेल तर मंत्री नाहीत, पीएस नाहीत किंवा सचिव नाहीत यासारखी कारणे देवून अधिका-यांना टाळले जाते. पण विशेष अधिवेशनाच्या दरम्यान सगळे असल्याने ही संधी सोडायची नसल्याची भावना काही अधिकारी खासगीत बोलून दाखवत आहेत. 

महत्त्वाचे म्हणजे बदल्यांसाठी आवश्‍यक असणा-या नागरी सेवा मंडळाच्या बैठकाही याच दरम्यान होत आहेत. त्यामुळे आवश्‍यक त्याठिकाणच्या जागेवर वर्णी लावून घेण्यासाठी अधिकारी बदल्यांच्या डेस्कवर आणि मंत्र्यांच्या दालनाच्या आसपास ठाण मांडून बसले आहेत.

हे अधिवेशन संपले की सर्व बदल्यांच्या फाईलीवर सह्या होणार आणि या अधिवेशना दरम्यानच सर्व सूत्रे हालणार याची कल्पना असल्याने अधिकारी याठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. तर मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या गोपनीय बैठकांचे सत्र तर अगदी जोरदार सुरू असल्याचेही चित्र पहायला मिळत आहे. 

संबंधित लेख