transfar | Sarkarnama

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्‍त ई. रविंद्रन यांची तडकाफडकी बदली

संजीव भागवत
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्‍त ई. रवींद्रन यांनी तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज(18) घेतला आहे.

रवींद्रन यांची नवी मुंबईतील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता येथे रिक्‍त असलेल्या आयुक्‍तपदी ही बदली करण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी पदावर संपदा मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्‍विनी जोशी यांची बदली झाल्याने गेल्या काही दिवसांपासून हे पद रिक्त होते. 

ई. रवींद्रन यांची आयुक्‍तपदावरून त्यांना साईड पोस्टींग दिल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. रवींद्रन यांना आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार प्रधान सचिव (2), नगर विकास विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांना सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी दिले आहेत. 

आयुक्‍त रवींद्रन यांच्या बदलीमागे कल्याण-डोंबिवली येथील भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांचा मोठा हात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ऑक्‍टोबर-2015पासून रुजू झालेल्या रवींद्रन यांनी अनेक गैरकामांना चाप लावला होता.

त्यातच आमदार नरेंद्र पवार यांच्याही अनेक कामांना आयुक्‍त रवींद्रन यांनी रोखून धरले होते. याचा राग डोक्‍यात ठेवून आमदार पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मोठी सेटिंग लावून रवींद्रन यांची बदली करण्यास भाग पाडले असल्याचे बोलले जात आहे. आता नवीन आयुक्‍त कोण येणार याकडेही कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे 

संबंधित लेख