Trailer of Thakarey movie launched | Sarkarnama

ठाकरेंच्या ट्रेलर'मध्येही  मोदींच्या ५६ इंच छातीवर टोमणे 

सरकारनामा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

.

मुंबई  : लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या 'ठाकरे' चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या '56 इंच की छाती' या बहुचर्चित विधानाचा समाचार बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत घेण्यात आला आहे . 'छाती किती इंचाची आहे ,यावर त्याची ताकद ठरत नसते, ताकद मेंदुत असते' या डायलॉगने शिवसेनेचा बाण आपल्या लक्ष्याचा अचूक भेद करणार आहे . 

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत लिखित 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी प्रदर्शित करण्यात आला. लोकसभा निवडणुकांच्या हंगामात हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे . 

मराठी भाषेचाच आग्रह धरणाऱ्या शिवसेनेने "ठाकरे' चित्रपट मात्र राष्ट्रीय पातळीवर जाऊन हिंदी भाषकांनाही शिवसेनेची भूमिका कळावी यासाठी मराठीबरोबरच हिंदीतही प्रदर्शित करत आहे. बाळासाहेब ठाकरेंवरील या "बायोपिक'चा फायदा पक्षाला व्हावा यासाठी शिवसेनेकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.

चित्रपटातील काही संवादांवर सेन्सॉरशिपची कात्री चालवली गेल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. मात्र याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे गेला असून अद्याप त्यावर कोणतीही कात्री चालली नसल्याचे याविषयी बोलताना स्पष्ट केले. 

 

संबंधित लेख