traffic inspector transfer from chakan | Sarkarnama

चाकणमध्ये पोलिसांतील वाद चिघळला! वाहतूक निरीक्षकाची बदली...

हरिदास कड
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

चाकण : चाकणमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तयार केलेल्या वाहतूक शाखेचे निरीक्षक उमेश तावसकर यांची दोन महिन्यांतच बदली झाली असून त्यांच्या जागी नवनाथ घोगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार व तावसकर अंतर्गत वाद सुरू असल्याचे बोलले जात होते. त्यातून तावसकर यांची तातडीने बदली करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. या बदलानंतर चाकणच्या वाहतुकीत काही सुधारणा होणार की पुन्हा पोलिसांतील वाद सुरूच राहणार का, याची आता धास्ती आहे.

चाकणची वाहतूक कोंडी जिल्ह्यात गाजत आहे. खासदार, आमदार आणि पोलिस यांच्यावर रोज सोशल मिडियातून यामुळे टीका होत आहे. औद्योगिक वसाहतीलाही या कोंडीचा त्रास होत असल्याने हे कारखाने थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार करतात. पुणे-नाशिक महामार्गावरून रोज पंच्च्याहत्तर हजारावर वाहने ये-जा करतात. वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे सातत्याने वाहतूक कोंडीला या मार्गावरील प्रवासी वैतागले आहेत. येथे अवैध वाहतुकीचाही मोठा विळखा आहे. त्याविरोधात खुद्द आमदार गोरे यांनी हातात दंडुके घेऊन रस्त्यावर यावे लागले होते.

तावसकर यांच्या नियुक्तीनंतर या परिस्थिती थोडाफार फरक पडला. रस्त्यावर पोलिस दिसू लागले. अवैध वाहतुकीला चाप बसला होता. मात्र काही नेतेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून अवैध वाहतूक सुरू करा असे सांगत आहेत. त्यातून हा वाद पेटला. या वादातून तावसकर यांची बदली झाली. पोलिसांच्या आणि नेत्यांच्या या राजकारणात चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणारच नाही का, अशी आता शंका येऊ लागली आहे.

संबंधित लेख