Traders reject to sale Pakistan's Sugar after MNS warning | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

पाकिस्तानी साखर विकण्यास व्यापा-यांचा नकार, मनसेच्या इशा-याने व्यापारी धास्तावले

तुषार खरात
सोमवार, 14 मे 2018

पाकिस्तानी साखर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये विक्री केल्यास कायदा हातात घेऊ, अशा इशारा मनसेने दिल्यानंतर मार्केटमधील व्यापारी धास्तावले आहेत. पाकिस्तानी साखरेची विक्री करणार नसल्याचे लेखी पत्रच `बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशन`चे अध्यक्ष अशोक जैन यांनी मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांना दिले आहे.

मुंबई : पाकिस्तानी साखर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये विक्री केल्यास कायदा हातात घेऊ, अशा इशारा मनसेने दिल्यानंतर मार्केटमधील व्यापारी धास्तावले आहेत. पाकिस्तानी साखरेची विक्री करणार नसल्याचे लेखी पत्रच `बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशन`चे अध्यक्ष अशोक जैन यांनी मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांना दिले आहे.

एवढेच नव्हे तर राज्यातील सर्व व्यापा-यांनाही असोसिएशनमार्फत आम्ही पत्र पाठवून पाकिस्तानी साखरेची विक्री करू नये, असे कळवणार असल्याचे जैन यांनी मनसेच्या पदाधिका-यांना सांगितले आहे.

पाकिस्तानी साखर एपीएमसी मार्केटमध्ये विकली जाणार असल्याचे गृहीत धरून आज मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मार्केटमध्ये हल्लाबोल केला. सुमारे ८० साखर व्यापा-यांच्या कार्यालयांत व गोडाऊनमध्ये घुसून त्यांनी पाकिस्तानी साखर शोधण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानविरोधात तसेच मोदी सरकारविरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

पाकिस्तानी साखर अद्याप व्यापा-यांकडे आलेली नाही. पण ती न्हावाशेवा, भिवंडी, कल्याण येथील गोडाऊनमध्ये असण्याची शक्यता आहे. त्या गोडाऊनमधून एपीएमसी बाजारात कोणत्याही परिस्थितीत साखर येणार नाही, यासाठी आम्ही फिल्डींग लावली असल्याचे काळे यांनी`सरकारनामा`ला सांगितले. एपीएमसी प्रशासनालाही आम्ही लेखी पत्र देणार असून अशी साखर बाजारात आणू नये, असे कळवणार असल्याचे काळे म्हणाले.
 

संबंधित लेख