त्या 154 प्रशिक्षणार्थींना पीएसआय म्हणून सामावून घेणार :देवेंद्र फडणवीस

हे कुठलेही प्रमोशन नाही. हे परीक्षा देवून पीएसआय म्हणून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी पूर्ण ट्रेनिंग घेतले आहे. त्यामुळे त्यांना आम्ही नोकरीमध्ये सामावून घेत आहोत.-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
psi_parade_
psi_parade_

मुंबई  : राज्यातील अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीतील 154 पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

"या 154 जणांचें कुठलेही प्रमोशन नाही तर ते सरळ सेवेतून पीएसआय झाले आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही नोकरीत सामावून घेत आहोत," अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन केली.

शासकीय सेवेतील अनुसुचित जाती जमातीतील कर्मचा-यांच्या पदोन्नतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक उमेदवारांचा पदोन्नतीचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

मात्र या प्रशिक्षणार्थींना दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंधरा दिवसांपूर्वी नाशिक येथून प्रशिक्षण पूर्ण होताच या १५४ जणांच्या नेमणुकीचा  प्रश्न राज्यभर गाजला होता . 

गुणवत्तेच्या आधारे उपनिरीक्षकाच्या प्रशिक्षणासाठी निवड आणि त्यानंतर 9 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी पार पडला होता . स्वत:चेच नव्हे तर कुटूंबियांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत असताना फक्त अवधी होता नियुक्तीपत्राचा... अन्‌ घडले विपरितच.  

154 पोलीस उपनिरीक्षकांना नियुक्ती पत्राऐवजी मूळ पदावर हजर होण्याचे पत्र हाती पडले. एवढेच नव्हे तर ९ ऑक्टोबर रोजी  भल्या पहाटे पोलीस अकादमीतून बाहेर पडण्याचेही आदेश बजावले गेले. 

पोलीस दलातील काहींनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती . ज्यामध्ये खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक झालेल्या 154 जणांना पदोन्नती दिली गेल्याचे म्हटले. त्यावर मॅटने सुनावणीदरम्यान, 154 जणांना तात्काळ त्यांच्या मूळ सेवेत पाठविण्याचे आदेश शासनाला दिले. त्यानुसार, अनुसूचित जाती-जमातीतील 154 जणांना   मूळसेवेत हजर होण्याचे आदेश  9 ऑक्टोबरला  बजावण्याचे  अकादमी देण्यास सांगण्यात आले होते .   

यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, " आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की, 154 पीएसआयना ट्रेनिंग घेतल्यानंतरही एका न्यायालयाच्या निर्णयामुळे रुजू करुन घेणे  शक्‍य होत नव्हते. "

"या संदर्भात आम्ही निर्णय घेतलेला आहे. हे कुठलेही प्रमोशन नाही. हे परीक्षा देवून पीएसआय म्हणून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी पूर्ण ट्रेनिंग घेतले आहे. त्यामुळे त्यांना आम्ही नोकरीमध्ये सामावून घेत आहोत," असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com