Topple down the useless BJP government : Ashok Chavan | Sarkarnama

केंद्र व राज्यातील बिनकामाच्या सरकारला उखडून फेका : अशोक चव्हाण

अरुण जोशी 
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

.

अमरावती :केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस भाजप-शिवसेना सरकार हे बिनकामाचे आहे.हे विघ्न दूर करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे.  केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस बिनकामाचे सरकार  उखडून   फेकल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही ,"असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खा अशोक चव्हाण यांनी चांदुर बाजार येथील खरेदी विक्री संस्थेच्या प्रांगणातील भव्य जाहीर सभेत बोलताना केले . 

 अमरावती जिल्ह्यातील  चांदुर बाजार येथील खरेदी विक्री संस्थाच्या प्रांगणावर  जनसंघर्ष यात्रेच्या भव्य सभेचे आयोजन केले असतांना या जनसंघर्ष यात्रा सभेचे अध्यक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा अशोक चव्हाण,तर मार्गदर्शक म्हणून माजी मुख्यमंत्री आ पृथीराज चव्हाण,,तसेच मार्गदर्शक  माजी मंत्री बाळासाहेब थोरात,महाराष्ट्र राज्य सहप्रभारी आशिष दुवा,खा राजीव सातव, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,आ मो आरिफ नसीम खान,,आ यशोमती ठाकूर, आ विरेंद्र जगताप,जिल्हा प्रभारी रविंद्र दरेकर,काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख ,जि प अध्यक्ष नितीन गोंडाने यांचेसह  व्यासपीठावर   अचलपूर मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित होते.

    जनसंघर्ष यात्रा सभेला संबोधित करतांना खा. अशोक चव्हाण पुढे बोलतांना म्हणाले की,"गेल्या साडेचार वर्षात भाजप-शिवसेनेचे सरकार एकही प्रश्न सोडवू शकले नाही.काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात देशात विकासात,उद्योग धंद्यात प्रथम क्रमांकावर असणारा महाराष्ट्र फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यामध्ये पहिल्या क्रमांकावर गेला आहे.राज्यात सतरा हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.स्वतःचे सरण रचून शेतकरी आत्महत्या करीत आहे.पण सरकार आत्महत्या थांबविण्यासाठी काहीच प्रयत्न करीत नाही.त्यामुळे राज्यातले फडणवीस सरकार नेमके कोणत्या कामात व्यस्त आहे?असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे." 
 
 माजी मुख्यमंत्री पृथीराज चव्हाण  म्हणाले की,"शेतकऱ्यांची परिस्थितीवर भाजपचे  नेते मंडळी अत्याचार करीत आहे.मोदीनी अच्छे दिनाचे घोषणा देऊन सत्तेत आले मात्र शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे.विदर्भातील शेतकरी प्रचंड अडचणीत येत आहे.पण सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.कर्जमाफी मिळाली नाही कापूस ,सोयाबीन ,तुरीला भाव नाही.गेल्या वर्षी खरेदी केलेल्या शेतीमालाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना दिले नाहीत.पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांची लूट केली जात जात असून ही योजना शेतकऱ्यांची नाही तर कंपन्यांच्या फायद्याची आहे."

बाळासाहेब थोरात आपल्या भाषणात म्हणाले की,मोदी आणि फडणवीस हुकूमशाही  पद्धतीने कारभार करीत आहे.भावी उमेदवार बबलू देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविक केले . कार्यक्रमाचे संचालन मंगेश देशमुख व आभार प्रदर्शन डॉ रविंद्र वाघमारे यांनी केले.

संबंधित लेख