हत्तीणीची हत्या हा मानवतेला कलंक : जितेंद्र आव्हाडांचे केरळच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

केरळमध्ये एक उपाशी व गर्भवती हत्तीणअन्नाच्या शोधात गावात पोहोचली. तिथे तिला स्फोटके असलेले अननस खाण्यास दिल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. याची राज्याचेगृहनिर्माण मंत्री जितेंद्रआव्हाड यांनीही दखल घेतली आहे. त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना श्री. आव्हाड यांनी पत्र लिहिले आहे
Jitendra Awhad Letter to Kerala CM About Killing of Elephant
Jitendra Awhad Letter to Kerala CM About Killing of Elephant

नाशिक : केरळमध्ये गर्भार हत्तीणीच्या स्फोटके असलेले अननस खाण्यासाठी देऊन करण्यात आलेल्या हत्येने देशभर काहूर उठले आहे. विशेषतः सोशल मिडीयावर त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील या हत्येने व्यथीत झाले आहेत. त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पत्र लिहून, "ही हत्या म्हणजे मानवतेला कलंक आहे' असे म्हटले आहे. 

केरळमध्ये एक उपाशी व गर्भवती हत्तीण अन्नाच्या शोधात गावात पोहोचली. तिथे तिला स्फोटके असलेले अननस खाण्यास दिल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. यावर सोशल मिडीयातून मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. केरळ सरकारवर देखील टिकेचा पाऊस पडत असून संबंधीतांवर कारवाईची मागणी होत आहे.

याची राज्याचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनीही दखल घेतली आहे. त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना श्री. आव्हाड यांनी पत्र लिहिले आहे. सामान्यतः आक्रमक स्वभावाचे व तेव्हढ्याच आक्रमकतेने प्रत्येक विषयावर बोलणारे श्री. आव्हाड या घटनेवर मात्र हळवे झालेले दिसतात. त्यांच्या पत्रात देखील त्यांनी ही भावना मांडताना अशा घटना रोखण्यासाठी दोषींवर अत्यंक कडक कारवाईची मागणी केली आहे. या पत्राची पत्र त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर व्हायरल केली आहे. 

जितेंद्र आव्हाड या पत्रात म्हणता.... मी एक प्राणीमित्र आहे. हत्तीणीच्या हत्येच्या बातम्यांनी व्यथीत झालो आहे. निष्पाप हत्तीणीचा मृत्यू दुःखद आहे. सामान्यतः हत्ती आक्रमक होत नसतो. मात्र तिला ग्रामस्थांनी स्फोटकांचे अननस खाण्यास दिल्यावर ती गावातील जवळच्या तळयाकाठी मृत्यूशी झुंज देत राहिली. मात्र तिला मृत्यूला सामोरे जावे लागले. केरळ हे प्रागतीक विचाराचे व निसर्गसंपन्न राज्य आहे. त्याचा विचार करुन या घटनेने राज्याच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्वतः लक्ष घालून अशा घटनांना प्रतिबंध करावा. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com