परभणीच्या मेडिकल काॅलेजसाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यासह शरद पवारांना साकडे..

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास तातडीने परवानगी मिळावी यासाठी येत्या आठवडाभरात राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट अधिवेशनापूर्वी घ्यावी असा ठरावया बैठकीत मंजुर करण्यात आला. यासाठीखासदार फौजिया खान व अॅड. विजयराव गव्हाणे यांनी पुढाकार घेतला.
Parbhani Sangarsh Samitee aracive for medical college news
Parbhani Sangarsh Samitee aracive for medical college news

परभणी ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी राष्ट्रवादी- भाजप व शिवसेना हे तीन्ही पक्ष एकत्रित आले आहेत. या शिवाय संघर्ष समितीने देखील पूर्ण ताकदीनिशी संघर्षासाठी सर्वांनी तयार हाण्याचे आवाहन करत आक्रमक भूमिका घेतली आहे.  पक्षभेद बाजूला सारून परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट तयार करावी, असा ठराव रविवारी परभणीकर संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

येथील महात्मा फुले विद्यालयात परभणीकर संघर्ष समितीची बैठक रविवारी (ता.सहा) झाली.  या बैठकीस समितीच्या संयोजक खासदार फौजिया खान, माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे, तहसिन अहेमद खान, डॉ. विवेक नावंदर, सुभाषराव जावळे, विजयराव जामकर, डॉ. राजगोपाल कालानी, के.पी.कनके, निवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, किर्तीकुमार बुरांडे, सरचिटणीस रामेश्वर शिंदे, अजयराव गव्हाणे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बैठकीस उपस्थितांनी जिल्ह्यातील विकास प्रश्नावर आपली मते मांडली. यात शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयाची परभणी जिल्ह्याला कशी गरज आहे याची माहिती सर्वांनी दिली. माजी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी प्रशासकीय पातळीवर कशा पध्दतीने पावले उचलावी लागतील. याची माहिती देत वैद्यकीय महाविद्यालय मिळत नसल्याने आपल्याला चिड आली पाहिजे, असे सांगितले. अॅड. राजकुमार भांबरे यांनी परभणी जिल्ह्यातील शासकीय कार्यालय पळविण्याची स्पर्धा लागली असून त्यावर अंकुश ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. 

डॉ. राजगोपाल कालानी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळणे हा परभणीकरांचा हक्क आहे असे सांगून आपण आता लढा तीव्र केला पाहिजे, असे आवाहन केले. नगरसेवक विजयराव जामकर यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून एकजूट दाखवावी लागणार आहे असे सांगत आपण सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. जेष्ठ पत्रकार संतोष धारासुरकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळवण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागणार आहे हे स्पष्ट केले. वैद्यकीय महाविद्यालयासाठी कृषी विद्यापीठाची जमीन मिळण्यात असलेल्या अडचणी देखील त्यांनी समितीसमोर मांडल्या.

शरद पवारासंह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास तातडीने परवानगी मिळावी यासाठी येत्या आठवडाभरात राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट अधिवेशनापूर्वी घ्यावी असा ठराव या बैठकीत मंजुर करण्यात आला. यासाठी खासदार फौजिया खान व अॅड. विजयराव गव्हाणे यांनी पुढाकार घेतला.

परभणीकरांवर अन्याय होत आहे, दोन वेळा समिती आली. दोन्ही समितीने सकारात्मक अहवाल दिला आहे. पंरतू दोन्ही वेळा हुलकावणी दिल्या गेली. आता महाविद्यालयासाठी तीव्र भुमिका हवी आहे. जिल्ह्याचा विकास करायाचा असेल तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका फैजिया खान यांनी बैठकीत घेतली.

तर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यानंतर विकासाचे दालन उघडले जाणार आहे. त्यासाठी सर्वबाजूने ताकद उभी करणे गरजेचे आहे. स्वताचा व जिल्ह्याचा विकास साध्य करायचा असेल तर संघर्षाची तयारी आपण सर्वांनी ठेवली पाहिजे, असे आवाहन माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे यांनी केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com