top boss gondhalekar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

गोंधळेकरच टॉप बॉस!

अनिश पाटील 
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

मुंबई : नालासोपाऱ्यात स्फोटकांचा साठा जप्त करून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) घातपाती कारवायांचा मोठा कट उद्‌ध्वस्त केला. या संपूर्ण कटकारस्थानप्रकरणी अटक केलेल्या सर्व आरोपींमध्ये पुण्यातून अटक केलेला सुधन्वा गोंधळेकरचे स्थान सर्वात वरचे आहे. तो या प्रकरणातील मास्टरमाईंडपैकी एक असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

पुण्यातून "डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग'चे शिक्षण घेतलेला गोंधळेकर हा मुळचा साताऱ्याचा आहे. त्याचा पुण्यात पर्वती परिसरात ग्राफिक डिझायनिंगचा व्यवसाय असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, तो शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचा कार्यकर्ता असल्याचेही उघड झाले आहे. 

नालासोपारा परिसरातून स्फोटकांसह वैभव राऊत व शरद कळसकर यांना अटक केल्यानंतर एटीएसने पुण्यातून गोंधळेकरला अटक केली होती. पुढे याप्रकरणी जालन्यातून माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याला अटक करण्यात आली. तपासानुसार गोंधळेकर खालोखाल पांगारकर व इतर आरोपी "फुट सोल्जर' असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

सात वर्षांपासून पांगारकर, लंकेश प्रकरणातील आरोपी अमोल काळे व गोंधळेकर एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी हा संपूर्ण कट रचून तरुणांची भरती करणे, प्रशिक्षण देणे, घातपाती कारवायांचे कट आखणे आदी कामे केल्याचा संशय आहे. 
गोंधळेकरने दडवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा "एटीएस'च्या हाती लागला. यातील पिस्तूल व एअरगनचा वापर प्रशिक्षणासाठी, तसेच विचारवंतांच्या हत्यांमध्ये केल्याचा दाट संशय आहे. 

पाच राज्यांत टार्गेट 
या गटाच्या टार्गेटवर विचारवंत, साहित्यिक व लेखकांसह व्हीव्हीआयपी व्यक्तीही असल्याचे सूत्रांनी सांगितले. घातपातासाठी व्यक्ती व ठिकाणांची यादी त्यांनी बनवली होती. हा संपूर्ण तपास पाच राज्यांत होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित लेख