Toor Scam Congress puts flex on Pune Roads | Sarkarnama

#ToorScam दाल मे कुछ काला है : तूरडाळ काळ्याबाजाराचे राजकारण आता पुण्याच्या रस्त्यांवर

उमेश घोंगडे 
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पैसे भरूनदेखील राज्याच्या अन्न धान्य वितरण विभागाला न मिळालेल्या तूरडाळीचे राजकारण आता पुण्याच्या रस्त्यांवर सुरू झाले आहे. महात्मा फुले मंडईसह शहरात काही ठिकाणी डाळीच्या काळ्याबाजाराकडे लक्ष वेधणारी होर्डींग लावण्यात आली असून 'दाल मे कुछ काला है' असे म्हणत या एकुण व्यवहाराविषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे. 

पुणे : पैसे भरूनदेखील राज्याच्या अन्न धान्य वितरण विभागाला न मिळालेल्या तूरडाळीचे राजकारण आता पुण्याच्या रस्त्यांवर सुरू झाले आहे. महात्मा फुले मंडईसह शहरात काही ठिकाणी डाळीच्या काळ्याबाजाराकडे लक्ष वेधणारी होर्डींग लावण्यात आली असून 'दाल मे कुछ काला है' असे म्हणत या एकुण व्यवहाराविषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे. 

प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी ही होर्डिंग लावली आहेत. तूरडाळीच्या या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट गप्प का आहेत, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. 21 हजार टन तूरडाळीचा हा गैरप्रकार मोठा आहे. या विषयाकडे सत्ताधाऱ्यांनी पुरेशा गांभिर्याने पाहावे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. 21 हजार टनांचा हा काळाबाजार 'सकाळ'ने नुकताच उजेडात आणला होता. त्यावरून राजकीय पातळीवर खळबळ उडाली होती. तूरडाळीच्या या काळ्याबाजारात आधिकारी लॉबीचा हात असल्याचे बोलले जात आहे. 

21 हजार टन तूरडाळीच्या काळाबाजाराचा हा घोटाळा असूनही याकडे राज्य सरकार तितकेसे गांभीर्याने पाहात नाही, असा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात बोलताना बालगुडे यांनी अन्य व नागरी पुरवठा मंत्री तसेच राज्य सरकारवर कडाडून टीका केली. एकीकडे सर्वमामान्य माणसाच्या आवाक्‍याबाहेर जाणारे डाळीचे दर तर दुसरीकडे आधिकाऱ्यांच्या मार्फत होणारा काळाबाजार यातून सामान्य माणसाला झळ बसत आहे. एवढे होऊनही सरकार कोणतीच कारवाई करीत नाही, असा आरोप बालगुडे यांनी केला आहे.

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख