todfod in islampur rest house | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

VIP रेस्ट हाऊस न मिळाल्याने मंत्र्याच्या ड्रायव्हरने केले खळ्ळखट्याक!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

मद्यधुंद व्यक्‍तीसह अन्य दोघांनी हा प्रकार केल्याची चर्चा आहे.

इस्लामपूर (सांगली) : शासकीय विश्रामगृह उघडून दिले नाही म्हणून विश्रामगृहाच्या व्हीआयपी कक्षाचा दरवाजा दगडाने फोडण्याचा प्रकार येथे घडला. संबंधित व्यक्ती एका मंत्र्याच्या गाडीची चालक आहे.

घटनेनंतर प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली. मात्र, त्याची वाच्यता जिल्हाभर झाली आहे. शनिवारी (ता. 6) रात्री साडेअकराच्या सुमारास प्रशासकीय इमारतीलगतच्या शासकीय विश्रामगृहाचा मुख्य काचेचा दरवाजा फोडण्यात आला. मद्यधुंद व्यक्‍तीसह अन्य दोघांनी हा प्रकार केल्याची चर्चा आहे. दरवाजावर दगड घालून "प्रशासकीय यंत्रणा आमचे काही बिघडवू शकत नाही', असा संदेश देण्याचा प्रयत्न संबंधितांनी केला. हा प्रकार अंगलट येणार, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांची हात जोडून माफी मागितली. 

संबंधित लेख