आजचा वाढदिवस : हर्षवर्धन पाटील

आजचा वाढदिवस : हर्षवर्धन पाटील

राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस! रूबाबदार आणि देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राज्याच्या राजकारणात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.

हर्षवर्धन यांनी बावडा (ता. इंदापूर) या आपल्या गावातून राजकारणाला सुरवात केली. नंतर ते पुणे जिल्हा परिषदेवर सदस्य झाले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार म्हणून निवडून आले. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर त्यांना तेव्हाच्या शिवसेना-भाजपच्या युतीच्या मंत्रिमंडळात कृषी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. 1995 पासून 2014 पर्यंत त्यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्त्व केले. या 25 वर्षांतील दोन वर्षांचा अपवाद वगळला तर त्यांच्याकडे सदैव "लाल दिवा' होता. सहकार, पणन, रोजगार हमी, विधिमंडळ कामकाज अशी खाती त्यांनी तडफेने सांभाळली.

मनोहर जोशी ते पृथ्वीराज चव्हाण अशा 25 वर्षांतील प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात असलेले एकमेव मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. अशी कामगिरी असणारे राज्याच्या राजकारणात फारच कमी मंडळी असतील. कर्मयोगी, नीरा भीमा या दोन साखर कारखान्यांची धुरा ते सांभाळत आहेत. पुणे जिल्ह्यात कॉंग्रेसचे काही एकांडी शिलेदार राहिले आहेत. त्यात हर्षवर्धन यांचा पहिला क्रमांक आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com