आजचा वाढदिवस : हर्षवर्धन जाधव (आमदार) 

आजचा वाढदिवस : हर्षवर्धन जाधव (आमदार)
आजचा वाढदिवस : हर्षवर्धन जाधव (आमदार) 
आजचा वाढदिवस : हर्षवर्धन जाधव (आमदार) 

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार. कन्नड मतदारसंघातून ते सलग दुसऱ्यांदा निवडूण आले आहेत. 2009 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर ते विजयी झाले होते. 2014 च्या विधासभा निवडणुकीपुर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. जाधव यांची राजकीय कारकीर्द पिशोर गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरु झाली. कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती हर्षवर्धन जाधव यांनी आपले वडील स्व. रायभान जाधव यांच्या नावाने उभारलेल्या विकास आघाडीच्या ताब्यात आहे. जाधव यांचे वडील रायभान जाधव व आई श्रीमती तेजस्वीनी जाधव यांनी देखील आमदार म्हणून कन्नड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पिशोर गटातून हर्षवर्धन यांच्या पत्नी संजना जाधव पराभूत झाल्याआहेत. हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com