Time tested friendship among MP Sanjay Jadhav & Pratap Jadahav | Sarkarnama

परभणी : खासदार संजय जाधव व माजी महापौर प्रताप देशमुख यांचीकाळाच्या कसोटीवर टिकलेली  मैत्री 

गणेश पांडे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मैत्रीचे नाते जसे पवित्र तसेच ते घट्ट ही असते. राजकारणासारख्या सार्वजनिक क्षेत्रात काम करत असतांना ऐकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करण्यास ही मागे- पुढे न पाहणारे दोन भिन्न पक्षीय राजकारणी त्यांच्या वयक्तीक आयुष्यात मैत्रीचे नाते मात्र मनापासून जपतात, नव्हे तर ते वृध्दींगत केल्याचे आपण पाहतो.

परभणी :  परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव व माजी महापौर प्रताप देशमुख या दोन धुरंधर राजकारण्यातील मैत्री ही सर्व परिचित आहे. दोघे ही राजकारणात असतांनाही या दोघांच्या मैत्रीत कधीही राजकारण आले नाही. त्यामुळेच गेल्या 30 ते 35 वर्षापूर्वीची जुनी मैत्री आजही तितकीच घट्ट आहे.

परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेनेत आहेत तर माजी महापौर हे राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये. या दोघांची मैत्री महाविद्यालयीन जीवनापासून सुरु झाली. प्रताप देशमुखांचे क्रांतीचौक परिसरात जयभवानी मित्रमंडळ तर काद्राबाद प्लॉट परिसरात संजय जाधव यांचे राजे संभाजी मित्र मंडळ असायचे. पण कधी दोन्ही मित्र मंडळामध्ये तणाव झाला नाही.

याच मुख्य कारण या दोघांची मैत्री हेच होते. हळू -हळू प्रताप देशमुख राजकारणात आले. अवघ्या 21 वर्षी ते नगरसेवक झाले. तर दुसरीकडे संजय जाधव हे शिवसेनेत कार्य करत राहिले. प्रताप देशमुखांना राजकारणाचा वारसा होता. परंतू संजय जाधव यांना कसलाही वारसा नसतांही त्यांची समाजसेवा करण्याची इच्छा त्यांना राजकारणात घेऊन आली. मोठ्या संघर्षानंतर संजय जाधव राजकारणात आले.

 या दोघांच्या मैत्री संदर्भात सांगतांना प्रताप देशमुख म्हणाले,' मी नगराध्यक्ष  असतांना लोकहिताच्या प्रश्नावर संजय जाधव यांनी अनेक वेळा त्यांच्या विरोधात मोर्चे काढले. परंतू या मुळे कधीही दोघांच्या मैत्रीत कटूता आली नाही. लोकांच्या प्रश्नावर त्यांनी त्यावेळी घेतलेली ही भुमिका होती. तो एका पदाविरुध्द केलेला लढा होता. '

" त्यामुळे आमच्या कामात सुधारणा होत गेली. अत्यंत आक्रमक पण मनाचा तितका मृदु असा मित्र माझ्या जीवनात मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. आज संजय जाधव देशाच्या सर्वोच्य संस्थेचे सदस्य आहेत. याचा मला मित्र म्हणून सार्थ अभिमान आहे असे प्रताप देशमुख यांनी सांगितले.

खासदार संजय जाधव म्हणाले, आमची मैत्री फार जुनी आहे. " कालांतराने आम्ही वेगवेळ्या पक्षात आलो. मात्र कधी मतभिन्नता झाली नाही. राजकारण सर्व काही नसते. मित्रता त्यापेक्षी मोठी आहे. मी आज ज्या पदावर आहे. त्या पदावर पोहचण्यासाठी मला माझ्या मित्रांची साथ लाभली. प्रताप देशमुख हे माझे मित्र आहेत हे सांगतांना मला अभिमान वाटतो. एक संयमी, मितभाषी व स्वतापेक्षाही मित्रावर प्रेम करणारा मित्र मला प्रताप देशमुख यांच्या रुपाने भेटला आहे,' असे खासदार संजय जाधव यांनी सांगितले.

 

संबंधित लेख