विरोधकांची `ठग्ज आॅफ महाराष्ट्र` अशी पोस्टरबाजी

विरोधकांची `ठग्ज आॅफ महाराष्ट्र` अशी पोस्टरबाजी

मुंबई: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आज जारी केलेले `ठग्ज ऑफ महाराष्ट्र` हे पोस्टर आज चर्चेचे ठरले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो झळकत आहेत.

आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांचा ठग्ज आॅफ हिंदुस्थान हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याचा आधार घेऊन विरोधी पक्षांनी ही कल्पक पोस्टरबाजी केली. या अधिवेशनाची रणनिती ठरविण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांच्या बैठक पार पडली.

या बैठकीला विधान परिषेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, जयंत पाटील, सपाचे अबू आसिम आझमी, बसवराज पाटील, हेमंत टकले, जिवा पांडू गावीत, कपिल पाटील, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा, धनगर तसेच मुस्लिम आरक्षणासह दुष्काळावर सत्ताधा-यांना कोंडीत पडणार असल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले.

सरकारच्या ठगबाजीची चार वर्षे असे नाव पोस्टरला देण्यात येवून, गेल्या चार वर्षात विविध विभागात कशी पिछेहाट झाली आहे ते नमूद केले आहे. पोस्टरवर जनतेशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, भावनिक ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी वगैरे नावे दिली आहेत. या पोस्टरद्वारे सरकारवर जहरी टीका केली असून हे पोस्टर चर्चेचा विषय झाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com