शेतकरी विरोधी खोटारड्या सरकारला खाली खेचा : अजित पवार

पाच वर्षात राज्यातील पंधऱा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यातुन केंद्र व राज्य सरकारचे अपयश स्पष्ट होते. आणीबाणीत जेलमध्ये गेलेल्यांना दहा हजार, साधुंना पाच हजार तर शेतकऱ्यांना रोज साडेतीन रुपये देऊन भाजप सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. काळा पैसा आणण्याचे व पंधरा लाख रुपये देण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या खोटारडया मोदी सरकार खाली खेचा असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.
शेतकरी विरोधी खोटारड्या सरकारला खाली खेचा : अजित पवार

भिगवण : पाच वर्षात राज्यातील पंधऱा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यातुन केंद्र व राज्य सरकारचे अपयश स्पष्ट होते. आणीबाणीत जेलमध्ये गेलेल्यांना दहा हजार, साधुंना पाच हजार तर शेतकऱ्यांना रोज साडेतीन रुपये देऊन भाजप सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. काळा पैसा आणण्याचे व पंधरा लाख रुपये देण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या खोटारडया मोदी सरकार खाली खेचा असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

बारामती लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या उमेद्वार सुप्रिया सुळे यांचे प्रचारार्थ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, माजी आमदार रमेश थोरात, प्रदीप गारटकर, अॅंड. महेश देवकाते, दशरथ माने, अप्पासाहेब जगदाळे, अॅंड. कृष्णाजी यादव, मयुरसिंह पाटील, लालासाहेब पवार, रमेश जाधव, यशवंत वाघ, संजय देहाडे, महारुद्र पाटील, शंकरराव गायकवाड, प्रवीण माने, हनुमंत बंडगर, अभिजीत तांबिले, प्रताप पाटील, डि.एन. जगताप, अमोल भिसे, मिलिंद मोरे, दिपक जाधव,उदयसिंह पाटील, पराग जाधव, संपत बंडगर, सरपंच अश्विनी शेंडगे, उपसरपंच रेखा पाचांगणे उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, "५४० कोटींचे राफेल १६०० कोटींना कसे खरेदी केले, देशात किती काळा पैसै परत आला व पंधरा लाख रुपयांचे काय या प्रश्नांचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले पाहिजे. इंदापुरमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीशिवाय तिसरा पक्षच नाही त्यामुळे एक लाखाचे मताधिक्य दयावे."

हर्षवर्धन पाटील म्हणाले, "चुकीच्या हातामध्ये सत्ता गेल्यास देशाचे कसे नकुसान होते हे लोकांनी पाच वर्षामध्ये पाहिले आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आली आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव देण्याबाबत सरकारने फसवणुक केली आहे. नोटबंदीमुळे देशातील लाखो तरुणांचे रोजगार गेले आहे. नोटबंदी केलेल्यांना आता वोटबंदी करुन सत्तेतुन बाहेर काढा,"

आमदार दत्तात्रय भरणे, शर्मिला पवार, रमेश थोरात, रमेश जाधव, रंगनाथ देवकाते, विजयकुमार गायकवाड, रियाज शेख, पांडुरंग मेरगळ, महेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिन बोगावत, सुत्रसंचालन महेश शेंडगे यांनी केले आभार प्रदीप वाकसे यांनी मानले. सभेचे अजिंक्य माडगे, बापुराव थोरात,जयदीप जाधव, अप्पा पवार, हेमंत निंबाळकर, अमोल देवकाते, सुरेश बिबे यांनी यांनी केले. कॉंग्रेस व राष्ट्रवादीची ही पहिलीच संयुक्त सभा असल्यामुळे सभेस मोठा प्रतिसाद मिळाला. सभेपुर्वी शर्मिला पवार यांनी रॅली काढली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com