दोन खोल्यांच्या वीज कनेक्शनसाठी तीन वर्षे संघर्ष! मंत्री बावनकुळे लक्ष घालतील काय?

दोन खोल्यांच्या वीज कनेक्शनसाठी तीन वर्षे संघर्ष! मंत्री बावनकुळे लक्ष घालतील काय?

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक खेड्यात आणि खेड्यातील प्रत्येक घरात वीज पोहोचल्याचा दावा केला असला तरी पुण्यातच एका कुटुबाला  वीज कनेक्शनसाठी तब्बल साडेतीन वर्षांचा संघर्ष करावा लागत आहे. वीज मंडळाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही दोन खोल्यांसाठी आवश्यक असलेले कनेक्शन अद्याप मिळू शकलेले नाही.

विलास व कल्पना मांडगे यांचे कुटुंब खराडी येथील पाराशर सहकारी गृहरचना संस्थेत वास्तव्यास आहे. त्यांचे याच पत्त्यावर रेशनकार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड आहे. या सोसायटीचा भाग दाखलाही त्यांच्या नावाने आहे. मांडगे कुटुंबियांनी वीज कनेक्शनसाठी २०१५ मध्ये अर्ज केला. त्यांच्या अर्जाची इतकी छानणी करण्यात आली की तो अर्ज कंपनीच्या विधी विभागाकडे पाठविण्यात आला. विधी विभागाने मांडगे यांना वीजजोड देण्यास हरकत नसल्याचा दाखला दिला. या दाखल्यानुसार रास्ता पेठ अधीक्षक अभियंत्यांनी वीजजोड देण्याचा आदेश दोन वेळा दिला. त्यावरही काहीच कार्यवाही झाली नाही.

याबाबत मांडगे यांनी सांगितले की काही लॅंड माफियांच्या दबावाला किंवा आमिषाला बळी पडून वीज वितरण कंपनीचे अधिकारी मला कनेक्शन देत नाहीत. माझ्या घराच्या आजुबाजुला बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या उद्योगांनी थ्री फेज कनेक्शन देण्यात आले आहेत. मला मात्र साधे घरगुती वापरासाठीही वीज मिळालेली नाही. सर्व विभागांचे ना हरकत दाखले सादर केल्यानंतरही नगर रस्ता विभागाचे अभियंते मला कार्यालयात दिवसभर बसवून ठेवतात आणि उद्या या असे सांगून, बोळवण करतात. गेली तीन वर्षे हा प्रकार सुरू आहे.``

हे वीज कनेक्शन द्यावे, यासाठी रास्ता पेठचे अधीक्षक अभियंता एस. एस. लटपटे यांनी २९ नोव्हेंबर २०१७ आणि दोन मे २०१८ असे दोन वेळा आदेश दिला. तरी त्याची दखल घेण्यात आली नाही. आता ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे तरी यात लक्ष घालतील का, अशी अपेक्षा मांडगे यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com