three shivsaink arrested in amravati | Sarkarnama

खासदार अडसूळांचा `डेंजर झोन इफेक्ट : तीन शिवसैनिकांना अटक

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 26 ऑगस्ट 2018

अमरावती  : एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात धिंगाणा घातल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी तीन शिवसैनिकांना अटक केली असून  नऊ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

शनिवारी (ता.२५) रात्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात एका खासगी वृत्तवाहिनीतर्फे निवडणूक सर्वेक्षणासंदर्भात आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडला होता. वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीच्या तक्रारीवरून शनिवारी रात्री राजापेठ पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी महानगरप्रमुख प्रा. प्रशांत वानखडे, राहुल माटोडे आणि जयेश पोटोळे यांना अटक केली.

 या कार्यक्रमात राजकीय पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि नागरिकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. सुरुवातीला देश तसेच राज्यातील सत्तेबाबत ओपिनियन पोल व त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघासंदर्भात कौल दाखविण्यात आला. 

दरम्यान, शिवसेनेचे पदाधिकारी संतापले, त्यांनी थेट व्यासपीठावर धडक देऊन कार्यक्रम उधळून लावत वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला मारहाण करून खुरच्यांची फेकफेक केली. त्यामुळे याप्रकरणाची तक्रार उशिरा रात्री राजापेठ पोलिसांत देण्यात आली, त्यावरून तिघांना अटक करण्यात आली असून अन्य सहाजणांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेतील तिघांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 

संबंधित लेख