threatnig calls to uday samant | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना दूरध्वनीवरून धमकी

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मुंबई : म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना धमकीचे दूरध्वनी येत आहेत. याबाबत त्यांनी पोलिस महासंचालकांना पत्र पाठवून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी केली असून, काही बरेवाईट झाल्यास प्रशासनच जबाबदार असेल, असे म्हटले आहे.

शिवसेनेचे रत्नागिरीचे आमदार असलेले सामंत यांची तीन महिन्यांपूर्वी म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. घराच्या किमती कमी केल्या आणि रहिवाशांना त्रास देणाऱ्या विकसकांविरोधात कारवाई केली; त्यामुळे धमकीचे दूरध्वनी येत आहेत, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या पत्राची एक प्रत मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयालाही पाठवण्यात आली आहे.  

संबंधित लेख