भाजप आमदार अतुल सावे यांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी

भाजप आमदार अतुल सावे यांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी

औरंगाबाद : पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार अतुल सावे यांना एका तरूणाने फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. " मी एका भाजप आमदाराचा खून करणार आहे, फडणवीस सरकारला माझे ओपन चॅलेंज आहे, थांबवू शकत असाल तर थांबवा' अशी धमकी या तरूणाने दिली आहे. प्रतिक्रीयेमध्ये त्याने आमदार अतुुल सावे यांचे नाव घेतल्याने एकच खळबळ उडाली. 

या धमकीची भाजपने गंभीर दखल घेतली असून पोलीस आयुक्तांना निवदेन देऊन धमकी देणाऱ्या तरुणाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. संभाजीराजे भोसले नावाने असलेल्या फेकबुक पेजवरून शनिवारी रात्री ही धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्या तरूणाचे नाव संभाजीराजे भोसले असून तो युवराज छत्रपती संभाजीराजे इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा.लि. औरंगाबाद या कंपनीचा संचालक असल्याचे त्याच्या पेजवर नमूद करण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त ब्राम्हणांनाच संरक्षण देतात असा आरोप करत त्याने वरील धमकी दिली आहे. सोशल मिडियावरून अतुल सावे यांना धमकी दिल्याचे समजताच आज (ता. 24) सकाळी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश नावंदर, मंगलमुर्ती शास्त्री यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन या संदर्भात लेखी निवेदन दिले आहे. या संदर्भात आमदार अतुल सावे यांच्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी फेकबुकवर जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे सांगितले. ते म्हणाले या प्रकरणी आमचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, तालुकाध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. पोलिस उपायुक्त दिपाली घाटे यांनी शिष्टमंडळाला संबंधितावर कठोर कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. पोलिसांचे एक पथक धमकी देणाऱ्या तरूणाच्या शोधासाठी गेल्याची माहिती देखील त्यांनी मला दिल्याचे सावे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com