Threat Letter to Chagan Bhujbal | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी 

संपत देवगिरे 
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचे तीन पानी पत्र आले आहे. संभाजी भिडे गुरुजी यांच्या विषयी वाक्‍यही तोंडातुन काढु नका अन्यथा तुमचा दाभोळकर, पानसरे झालाच म्हणुन समजा असा पत्रामध्ये आशय आहे. या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. यासंदर्भात आज नाशिक येथे पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. 

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचे तीन पानी पत्र आले आहे. संभाजी भिडे गुरुजी यांच्या विषयी वाक्‍यही तोंडातुन काढु नका अन्यथा तुमचा दाभोळकर, पानसरे झालाच म्हणुन समजा असा पत्रामध्ये आशय आहे. या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. यासंदर्भात आज नाशिक येथे पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. 

आज सकाळी भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानाच्या पत्त्यावर हे पत्र मिळाले. या तीन पानांच्या संगणकीय टंकलिखीत पत्रात अत्यंत शिवराळ भाषेचा प्रयोग करण्यात आला आहे. त्यामध्ये 'मनुस्मृतीचे पुरस्कर्ते भिडे गुरुजी आणि त्यांचे धारकरी यांची ताकद काय आहे हे माहित करुन घ्यावे. हा सल्ला आहे. तुम्हाला संपविण्यास आम्हाला काहीही वेळ लागणार नाही. हा धमकीचा इशाराच समजा. गुरुजीबद्दल बोलल्यास परिणामांना सज्ज रहावे. समीर भुजबळंकडे सुद्धा आम्ही बघणार आहोत. पुन्हा भिडे गुरुजींबद्दल वाक्‍यही तोंडातून काढू नये अन्यथा तुमचा दाभोळकर- पानसरे झालाच म्हणून समजा.' असा आशय आहे. यामध्ये  'इडी'ची कारवाई, न्यायालयीन खटला व अन्य तपशीलही आहे. 

यासंदर्भात आज दुपारी माजी आमदार जयंत जयंत जाधव यांनी पोलिस आयुक्तांकडे लिखीत तक्रार केली आहे. या धमकीची गंभीर दखल घ्यावी. संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कोंडाजीमामा आव्हाड, अॅड. रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधुने यांसह विविध पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते. त्यांनी यासंदर्भात निषेध करुन दोषीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. 

संबंधित लेख