Those workers expelled from Yuwa Sena : Aditya Thakarey | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

'त्या' कार्यकर्त्यांना  युवा सेनेतून काढले : आदित्य ठाकरे  

सरकारनामा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

यवतमाळ पोलिसांनी त्या आठ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.
 

मुंबई :  यवतमाळ येथे बुधवारी रात्री काश्‍मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करून या घटनेची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल करणाऱ्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना सेनेतून बाहेर काढले आहे, अशी माहिती युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्‌विटरवर दिली आहे.

 

 

 यवतमाळ येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दोन काश्‍मिरी विद्यार्थ्यांना यवतमाळच्या चिंतामणी मार्केट भागामध्ये युवा सेनेच्या आठ कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान अडवले होते. आपली देशभक्ती सिद्ध करण्यासाठी या दोघांनी 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम' घोषणा द्याव्यात अशी बळजबरी कार्यकर्त्यांनी केली. त्यासाठी या दोन विद्यार्थांना मारहाणही करण्यात आली. वरती या घटनेची व्हिडिओ क्‍लिपही वायरल करण्यात आली होती.

आदित्य ठाकरे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, " या प्रकारात गुंतलेल्या कार्यकर्त्यांना युवा सेनेतून काढून टाकण्यात आले आहे. जम्मू आणि काश्‍मीर हा भारताचा भाग आहे. दहशतवादाविरुद्ध राग जरूर असावा पण तो राग निरपराध लोकांवर काढला जाऊ नये.''

दरम्यान यवतमाळ पोलिसांनी त्या आठ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.
 

संबंधित लेख