Those who are in power are dividing different castes & religions | Sarkarnama

सत्ताधीशच विविध  जातीधर्मात तेढ निर्माण  करताहेत : जयंत पाटील 

धर्मवीर पाटील 
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

शहरातील सत्ताधारी गटाचे नगरसेवकच ठेकेदार झालेत, भूखंडावर डल्ला मारण्याचे काम सुरू असल्याचा आरोप शहाजी पाटील यांनी केला.

इस्लामपूर  : "नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून देशात ६०० छोट्या- मोठ्या दंगली झाल्या आहेत. सत्तेवर बसलेलेच वेगवेगळ्या जातीधर्मात तेढ निर्माण करीत आहेत", असा  आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील जाहीर सभेत केला.
     
आमदार पाटील यांच्या आमदार फंडातील विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, "देशातील जनतेने विकासाच्या नावावर मोदींसाहेबाना मतदान केले, मात्र या जनतेचा भ्रमनिरास झाला. देशात मॉब ब्लिचिंगचे प्रकार वाढतायत. भीमा कोरेगावची दंगल नियोजनबद्ध होती. पोलिसांनी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेय. मोदी सरकार प्रसारमाध्यमावरही दबाव आणत आहे. पोषक बातम्या आणत आहे. सोशल मीडियाच्या टीकेचे केंद्र देशाचे पंतप्रधान ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी एकावेळी केवळ पाचच संदेश पाठविण्याचे वॉट्सअपवर बंधन आणले आहे."

 विजय पाटील म्हणाले, "दीडशे कोटींचा निधी आणला म्हणणाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी दीड दमडी तरी आणली का? त्यांनी अपघाताने मिळालेल्या सत्तेचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी करावा. मैदानाची भाषा करणाऱ्याची उंची साहेबांच्या गुडघ्याएवढी तरी आहे का?" अँड. चिमण डांगे म्हणाले, "सत्ताधारी कोणतेही काम न करता मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करीत आहेत."

 

संबंधित लेख