Those five youths became chief ministers in future : Sharad Pawar | Sarkarnama

इंदिराजींनी निवडलेले ते पाचही युवक पुढे मुख्यमंत्री झाले : शरद पवार

मिलिंद संगई 
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना माणसांची किती पारख होती आणि किती दूरदृष्टी होती याचा किस्सा आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितला.

बारामती : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना माणसांची किती पारख होती आणि किती दूरदृष्टी होती याचा किस्सा आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितला. बारामतीच्या पासपोर्ट कार्यालयाच्या उदघाटनाप्रसंगी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 पवार म्हणाले," माझा एका आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात इंदिरा गांधी यांनी समावेश केला आणि मग पासपोर्ट काढायला मी मुंबईला गेलो. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर कसा तरी पासपोर्ट मिळाला. त्या वेळी इजिप्तला आमचे शिष्टमंडळ जाणार होते."

 "या शिष्टमंडळात माझ्यासह नारायणदत्त तिवारी, अर्जुनसिंग, सी.के. जाफरशरीफ आणि रेड्डी यांचा समावेश श्रीमती गांधी यांनी केला होता. आमच्या सर्वांचाच अत्यंत युवा काळातील हा पहिलाच परदेश दौरा होता, त्या मुळे आम्हाला कमालीचे औत्सुक्य होते."

" मात्र त्या नंतर काही कालावधीनंतर या शिष्टमंडळात इंदिरा गांधी यांनी ज्यांचा ज्यांचा समावेश केला होता, ते सर्वच जण मुख्यमंत्री झाले! गांधी यांची निवड किती अचूक होती हे काळानेच दाखवून दिले. त्या नंतर मी आजवर अर्धे जग फिरलो पण हा पहिला परदेश प्रवास स्मरणात आहे," असे पवार यांनी सांगितले.

 

संबंधित लेख