thombare and university | Sarkarnama

जिथे नोकरी केली त्याच विद्यापीठाचे धोरण ठरवण्यात आता सहभागी होणार...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

बीड : यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नीचा हात आणि यशस्वी पत्नीच्या मागे पुरुषाचा हात असतो. असेच, आमदार संगीता व डॉ. विजयप्रकाश ठोंबरे या दाम्पत्याची "हम साथ साथ है ' अशी आतापर्यंतची वाटचाल राहीली आहे. ज्या विद्यापीठात डॉ. विजयप्रकाश यांनी नोकरी केली. त्याच विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर काम करुन ते पुढच्या काळात विद्यापीठाचेच धोरण ठरविण्यात सहभाग घेणार आहेत. 

बीड : यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नीचा हात आणि यशस्वी पत्नीच्या मागे पुरुषाचा हात असतो. असेच, आमदार संगीता व डॉ. विजयप्रकाश ठोंबरे या दाम्पत्याची "हम साथ साथ है ' अशी आतापर्यंतची वाटचाल राहीली आहे. ज्या विद्यापीठात डॉ. विजयप्रकाश यांनी नोकरी केली. त्याच विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर काम करुन ते पुढच्या काळात विद्यापीठाचेच धोरण ठरविण्यात सहभाग घेणार आहेत. 

मध्यम कौटुंबिक परिस्थिती असतानाही मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर विजयप्रकाश ठोंबरेंनी राहूरीच्या प्रतिथयश महात्मा फुले कृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकपदाची नोकरी मिळविली. विविध पदांवर नोकरी करत त्यांनी कार्यालय प्रमुख म्हणूनही बढती मिळविली. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या कोल्हापूर, सोलापूर, लोणावळा व जेऊर येथील कृषि संशोधन केंद्रात त्यांनी कृषिसंबंधी वेगवेगळ्या कार्यशाळा व संशोधनात भाग घेवून मार्गदर्शन केले. डॉ. ठोंबरे यांचे कृषि संशोधनपर व तांत्रिक कृषि विषयांवरचे लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. 

कृषिविद्या विभागात "बदलत्या हवामानाचा भूईमूग व गवार आंतरपिकात होणारा प्रभाव' याविषयावर संशोधन करून विद्यापीठास प्रबंध सादर केल्यामुळे त्यांना याच विद्यापीठाची डॉक्‍टरेट पदवीही मिळालेली आहे. स्वत:चे करिअर घडविणाऱ्या डॉ. विजयप्रकाशरावांचे पत्नी संगीता ठोंबरे यांच्या आमदारकीच्या वाटचालीतही मोठे योगदान आहे. दोघांचा विवाह झाला. त्यानंतर संगीता ठोंबरेंची शिक्षणाची आवड पाहून विजयप्रकाशरावांनी त्यांना बळ दिले आणि पुढे संगीता ठोंबरे यांनी इंग्रजीतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण केले. 

विविध ठिकाणी नोकरी केल्यानंतर पोटनिवडणुकीतही डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्यामुळेच संगीता ठोंबरे यांना उमेदवारी मिळाली आणि त्या आमदार झाल्या. दरम्यान, आता डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांनाही त्यांनी नोकरी केलेल्या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून कामाची संधी मिळाली आहे. त्या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक आणि कार्यालय प्रमुख म्हणून काम करताना त्यांना सहाजिकच वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे लागे. पण, आता याच विद्यापीठाचे धोरण ठरविण्यात त्यांचा वाटा असणार आहे. विजयप्रकाश ठोंबरे यांच्या कृषीविषयक अभ्यास, त्यांचा अनुभव या जोरावर त्यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. 

संबंधित लेख