वादळ असो की पाऊस ते मंत्रालयावर झेंडा दररोज डौलात फडकवतात !

मंत्रालयावर फडकत असलेला झेंडा 14 बाय 21 फुटांचा अजस्त्र झेंडा आहे. जवळच समुद्र असल्याने पावसाळ्यात जोराचा वारा वाहत असतो, यावेळी झेंडा फडकवणे अतिशय धोकादायक असते. हा झेंडा फडकवण्यासाठी चार व्यक्तीची गरज असते.
Mantralay-zenda
Mantralay-zenda

मुंबई :  "रोज नित्य नेमाने हे काम पार पाडले जाते. उन, वारा, वादळ, पाऊस याचा विचार मनाला शिवत नसतो. या पवित्र कामाचा अभिमान काही औरच असतो, '' अशा शब्दांत आपल्या कामाबद्दल कृतज्ञता राजेंद्र कानडे यांनी व्यक्‍त केली आहे. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील झेंडा फडकावण्याचे कर्तव्य कानडे आणि त्यांचे चार सहकारी 365 दिवस इमान इतबारे करीत आहेत.

सध्या कानडे यांच्यासह ज्ञानेश्वर वारगडे, सुरेंद्र जाधव, सूर्यकांत कसबे आणि जयसिंग मकवाना हे कर्मचारी झेंडा फडकवण्याचे जबाबदारी पार पाडत आहेत.


स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी समाजातल्या प्रतिष्टीत व्यक्ती, समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक , मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडावंदन केले जाते. मात्र आपल्यातील एक घटक दररोज नित्यनेमाने देशाला वंदन करत झेंडा फडकवत असतो. तो घटक म्हणजे शासनदरबारी असलेला चतुर्थ श्रेणी कामगार .

वर्षातील 365 दिवस हे मानकरी झेंडावंदन करत असतात. ऊन वारा पाऊस काहीही असो त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे झेंडा फडकतच असतो. 15 ऑगस्ट 2018 या दिवशी ही सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी सूर्योदयाला राज्याचे शासकीय मुख्यालय मंत्रालयावर झेंडा फडकवला जाणार आहे.

रोज झेंडा फडकावणे आणि सुर्यास्ताला झेंडा सन्मानाने खाली घेणे हे त्यांचे काम आहे. या सन्मानाच्या कार्यासाठी राजेंद्र कानडे यांच्या सोबत अन्य पाच कर्मचारी आहेत.  सकाळची वेळ गाठण्यासाठी दोन कर्मचारी मंत्रालयात वास्तव्य करतात. मंत्रालयात जेव्हा 12 जून 2012 रोजी आग लागली होती तेव्हा याच कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून मंत्रालयावरील झेंडा उतरवला होता. 

त्या  घटनेची आठवण सांगताना कानडे म्हणाले की," आम्ही नेमके कोणत्या विभागाचे कर्मचारी आहोत हे सरकारमधील भल्याभल्याना माहित नसते. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आहोत. आमची ड्युटी इतर सरकारी कर्मचारी यांच्याप्रमाणे नसते. सकाळी पहाटे पाच वाजता आमची ड्युटी सुरू होते... आग लागली त्यावेळेस मंत्रालयाच्यावर फडकत असलेला झेंडा उतरवयाचा की नाहीं बाबत अधिकाऱ्यांमध्ये बराच खल झाला, या आपत्कालीन स्तिथीत काय करावे हे अधिकाऱ्यांना कळत नव्हते. आम्ही मात्र समारे आग असताना ठाम होतो. अखेर परवानगी मिळाल्यावर झेंडा सुरक्षित उतरवला. "


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com