...तर उद्धव ठाकरे हे मोदींचा अर्ज भरण्यासाठी काशीला जाणार

...तर उद्धव ठाकरे हे मोदींचा अर्ज भरण्यासाठी काशीला जाणार

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अहमदाबाद मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजर होते. अहमदाबाद येथे घटकपक्षांचे एकत्रित शक्तिप्रदर्शन झाल्यानंतर आता वाराणसीतही नरेंद्र मोदी यांचा अर्ज सादर करण्यासाठी मित्रांना निमंत्रण मिळणार काय, याकडे शिवसेनेचे लक्ष आहे.

यासाठीच उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 26) दिवसभरात कोणतीही सभा ठेवलेली नाही. निमंत्रण मिळाल्यास ते वाराणसीत जाण्याच्या तयारीत आहेत. 

मुंबईत समन्वय बैठका 

दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबई या दोन मतदारसंघांतील निवडणूक काहीशी प्रतिकूल झाली आहे असे सांगितले जाते. कॉंग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना व्यापारीवर्गाचा मोठा पाठिंबा मिळतो आहे. मराठमोळा उमेदवार अरविंद सावंत यांना पुन्हा निवडून येण्यासाठी मदत आवश्‍यक मानली जाते. भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा आणि राज पुरोहित यांनी त्यासाठी सक्रिय व्हावे अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात होती.

शिवसेनेच्या या निरोपाची दखल घेत भाजपने या नेत्यांना प्रचारात सक्रिय केले आहे. ईशान्य मुंबईतील मनोज कोटक यांना मदत करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक सक्रिय झाले आहेत. आज "मातोश्री'वर यासंबंधात बैठक झाली. मुंबईत जेथे गरज असेल तेथे परस्परांना मदत करायची असे ठरले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com