Then Sadabhau Khot will be felicitated in Swabhamani's gathering | Sarkarnama

तर ... स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत सदाभाऊ खोत यांचा सत्कार करणार !

सुनील पाटील
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

सदाभाऊ खोत यांनी या वर्षीच्या उसासाठी प्रतिटन जाहीर केलेला 3575 रुपये दर शेतकऱ्यांना विनाकपात दिला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमध्ये त्यांचा जाहीर सत्कार

कोल्हापूर  : राज्याचे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या वर्षीच्या उसासाठी प्रतिटन जाहीर केलेला 3575 रुपये दर शेतकऱ्यांना विनाकपात दिला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करतो. असे आव्हान प्रा. जालंधर पाटील आणि सावकार मादणाईक यांनी आज केले.

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

जालंधर पाटील म्हणाले, " सदाभाऊ खोत यांनी या वर्षी प्रतिटन उसाला तोडणी वाहतूक वगळून 3575 रुपये प्रति टन दर देता येईल अशी घोषणा केली होती. त्यांचे हे स्टेटमेंट सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. खोत यांनी जाहीर केल्याप्रमाणे यावर्षीची वर्षीची 3575 रुपये विनाकपात शेतकऱ्यांना द्यावी. "

" 24 ऑक्टोबरला रयत संघटनेच्या सभेत सदाभाऊ यांनी जाहीर केलेली  ही रक्कम शासनाची म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारावी. त्यानंतर 27 ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमध्ये सदाभाऊ खोत यांचा जाहीर सत्कार केला जाईल,"  असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज येथे दिले.

संबंधित लेख