then bachhu kadu could hit IAS officer1s head | Sarkarnama

...तर आमदार बच्चू कडूंनी त्या IAS अधिकाऱ्याचे डोकेच फोडले असते!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

आमदार बच्चू कडू आणि सरकारी अधिकाऱ्यांचे संघर्ष नवीन नाहीत. मात्र थेट आयएएस अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाण्याची त्यांची कालची पहिलीच वेळ. मंत्रालयातील पी. प्रदीप या अधिकाऱ्याने लाखो मुलांच्या भवितव्याचा विचार करायचे सोडून अहवाल मागितला आहे, असे ठोकळेबाज उत्तर दिले आणि बच्चू कडू यांचा पारा चढला...

 

 

पुणे : आमदार बच्चू कडूंनी काल मंत्रालयात आयएएस अधिकाऱयावल लॅपटाॅप उगारल्याने ते पुन्हा चर्चेच आले आहेत. खरे तर लाखो विद्यार्थ्यांच्या करियरशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर बच्चू कडूंनी पी. प्रदीप या अधिकाऱयांकडे तक्रार केली होती. मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे टोलवाटोलवी सुरू केली. तेव्हा चिडलेल्या कडू यांनी थेट लॅपटाॅप उगारला. आमदारांनी तेव्हा थोडक्यात आपला राव आवरला. नाहीतर त्या आयएएस अधिकाऱ्याचे डोकेच फुटले असते.

कालचा हा प्रकार नक्की काय घडला, याचा सविस्तर खुलासा कडू यांचे सहकारी अॅड. अजय तापकीर यांनी आपल्या फेसबुक अकौंटवरून दिला आहे. तो पुढीलप्रमाणे :

सरकारी अधिकारी होण्यासाठी महाराट्रातील लाखो विद्यार्थी दिवस रात्र एक करून परीक्षेची तयारी करतात, सरकार जागा कमी जाहीर करते पण लाखो विद्यार्थी परीक्षा शुल्क देतात व परीक्षेला बसतात,
राज्य सरकारने mpsc मार्फत घेणारी परीक्षा नवीन खाजगी IT कंपनी नेमून घेण्याचे जाहीर केले, या कंपनीने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये गोळा केले व सरकारला महा परीक्षा पोर्टल तयार करून महाराष्ट्रात 5-6 परीक्षा घेतल्या या ऑनलाईन परीक्षेत प्रचंड गोंधळ व अपारदर्शकता असल्याच्या तक्रारी हजारो विद्यार्थ्यांनी सरकारकडे केल्या होत्या. पण कोणतीच कारवाई सरकार करत नव्हते.

 
आमदार कडू यांच्याकडे या विद्यार्थ्यांनी संपर्क करून त्यांच्या वेदना मांडल्या भाऊंनी 22 तारखेस मुख्यमंत्री व अधिकारी यांना पत्र लिहून विद्यार्थी समस्या कळवल्या, या पत्रावर अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती घेण्यासाठी कडू हे कार्यकर्त्यांसोबत महाराष्ट्र राज्य माहिती संचानालय संचालक प्रदीप पी. या अधिकाऱ्याच्या मंत्रालयातील केबिन मधे दाखल झाले, बच्चूभाऊ यांनी शांत पणे विद्यार्थ्यांचे प्रश्न अधिकाऱ्यास सांगितले व आपण माझ्या पत्रावर केलेल्या कारवाही बाबत माहिती विचारली, या अधिकाऱ्याने तुमच्या पत्रावर मी कनिष्ठ अधिकाऱ्याकडून अहवाल मागितला आहे, हे सरकारी उत्तर दिले.

बच्चूभाऊ या अधिकाऱ्यास पुढील 10 मिनिटे हा विषय महाराट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी कसा महत्वाचा आहे हे समजावून सांगत होते पण अधिकारी भाऊंचे न ऐकता हे कशाला माझ्या केबिन मध्ये आले आहेत असा चेहरा करून पाहत होता, भाऊंनी पुढील पाच मिनिटे त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्यात व तुम्ही कशी तात्काळ संबंधित कंपनीवर कारवाई करू शकतात हे समजावण्यात घालवली पण अधिकाऱयांचे एकाच उत्तर मी अहवाल मागवला आहे, हे ऐकून भाऊंचा सयंम संपला व भाऊंनी अधिकाऱ्याच्या टेबल वरील लॅपटॉप उचलून अधिकाऱ्याच्या टेबल व आपटला व कानाखाली वाजवण्यासाठी पुढे आले मी बाजूला असल्याने भाऊंचा हात धरला व पुढील प्रसंग टाळला, पण मला सांगा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अधिकार्त्यांशी कसे वागायला हवे, असे तापकीर यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख