शिवसेना नगरसेवकाच्या कारचे आरसे लांबवले – चोरटे ताब्यात

ठाण्यात वाहनांसह गाड्यांचे टायर चोरीला जाण्याच्या घटना ताज्या असतानाच आता आलिशान कारचे आरसेदेखील चोरटे लांबवत असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील शिवसेना नगरसेवक संजय देवराम भोईर यांच्या दोन आलिशान मोटरीचे सुमारे 55 हजार रुपये किंमतीचे आरसे चोरट्यांनी लांबवल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.
शिवसेना नगरसेवकाच्या कारचे आरसे लांबवले – चोरटे ताब्यात

ठाणे : ठाण्यात वाहनांसह गाड्यांचे टायर चोरीला जाण्याच्या घटना ताज्या असतानाच आता आलिशान कारचे आरसेदेखील चोरटे लांबवत असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील शिवसेना नगरसेवक संजय देवराम भोईर यांच्या दोन आलिशान मोटरीचे सुमारे 55 हजार रुपये किंमतीचे आरसे चोरट्यांनी लांबवल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. 

याप्रकरणी,भोईर यांनी कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी राबोडी येथील दुकलीपैकी एका चोराला ताब्यात घेतले आहे. ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांच्या बाळकुम पाडा नं.3 येथील राहत्या घरासमोरून त्यांच्या इनोव्हा आणि फॉर्च्युनर या आलिशान गाड्यांचे आरसे चोरट्यांनी लांबवले होते. इनोव्हा कारचा 15 हजारांचा एक आरसा आणि 40 हजारांचे फॉर्च्युनरचे दोन आरसे चोरट्यांनी लंपास केले होते.

याबाबत तक्रार दाखल होताच कापुरबावडी पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही फुटेज तपासून राबोडी परिसरातून एका चोरट्याला ताब्यात घेतले असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com