उल्हासनगरचे तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर लिहिणार खरमरीत पत्र

स्मार्ट सिटीचा ध्यास घेऊन गणेश पाटील यांनी सोमवारी सायंकाळी उल्हासनगर पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
उल्हासनगरचे तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर लिहिणार खरमरीत पत्र

उल्हासनगर : स्मार्ट सिटीचा ध्यास घेऊन गणेश पाटील यांनी सोमवारी सायंकाळी उल्हासनगर पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. 

दरम्यान, पुण्याला अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झालेले तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी उल्हासनगरात आलेल्या अनुभवावरून खरमरीत पत्र लिहिण्याचा मनोदय व्यक्त केला. 

निंबाळकर यांनी प्रथम पुणे गाठून आणि तेथील अतिरिक्त आयुक्तांचा पदभार स्वीकारून पुन्हा उल्हासनगर गाठले. गणेश पाटील यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार सोपवला. पाटील यांचे महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, माजी आमदार कुमार आयलानी आदींनी स्वागत केले. 

शहराचा तसेच येथील कामे, योजनांचा अभ्यास करून विकासाच्या दृष्टीने आणि उल्हासनगरला स्मार्ट सिटीच्या पंक्तीत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे नवआयुक्त गणेश पाटील यांनी सांगितले. 
आयुक्त म्हणून येथे काम करताना आलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांवर आधारित खरमरीत पत्र लिहिण्याचा मनोदय निंबाळकर यांनी व्यक्त केला. 

`शिवसेना गणेश पाटील यांची स्वतंत्र भेट घेणार' 
तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कोणत्याही नगरसेवकांना विकास निधी दिला नाही. त्यांनी नेहमी पालिकेच्या खस्ता-हालतीचे गाऱ्हाणे मांडले. निधीच नाही, तर प्रभागात विकास कसा करणार? असा प्रश्‍न शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी उपस्थित केला आहे. नवआयुक्त गणेश पाटील यांच्याकडून निधीची आणि विकासकामांची अपेक्षा असून त्यासाठी शिवसेना त्यांची स्वतंत्र भेट घेणार आहे, असे राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे यांनी सांगितले. दरम्यान, निंबाळकर यांच्या जाण्याच्या आणि पाटील येण्याच्या निमित्ताने शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर फटाकेबाजी केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com