Thane minister Eknath Shinde when serves food ! | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे वाढप्याच्या भुमिकेत...

श्रीकांत सावंत : सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

ठाणे : ठाणे शहरामध्ये साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाणेकर नागरिकांना ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे वेगळेच रुप पहायला मिळाले.

एरवी कामाची पाहणी, कार्यकर्त्यांशी मसलती, नागरिकांशी संवाद, अधिकाऱ्यांना जाब विचारणारे आणि कामात गढून गेलेल शिंदे गणेशोत्सवाच्या काळात  ठाणेकरांना महाप्रसाद वाटप करताना दिसून आले. 

ठाणे : ठाणे शहरामध्ये साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाणेकर नागरिकांना ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे वेगळेच रुप पहायला मिळाले.

एरवी कामाची पाहणी, कार्यकर्त्यांशी मसलती, नागरिकांशी संवाद, अधिकाऱ्यांना जाब विचारणारे आणि कामात गढून गेलेल शिंदे गणेशोत्सवाच्या काळात  ठाणेकरांना महाप्रसाद वाटप करताना दिसून आले. 

जेवणाच्या पंगतीमध्ये वाढप्याची भुमिका महत्वाची मानली जात असून ज्याच्या जवळचा वाढपी त्याच्या ताटामध्ये जास्त बुंदी हे समिकरण ठरलेले असते. राजकारणातील महत्वाची पदे भुषवणारी मंडळीही वाढप्याच्या भुमिकेतूनच शहरांच्या ताटामध्ये विकासाची बुंदी वाढत असतात. तर लोकशाहीतील महत्वाचा घटक असेले मतदारही पाच वर्षातून एकदा मतांच्या रुपाने राजकिय मंडळींच्या ताटामध्ये सत्तेचा प्रसाद देत असतात. 

ठाणे महापालिकेच्या निमित्ताने ठाणेकरांनी शिवसेनेच्या आणि पर्यायाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताटामध्ये संपुर्ण सत्तेचा महाप्रसाद वाढल्यानंतर त्याचीच परतफेड करण्यासाठी शिंदे थेट ठाणेकरांच्या ताटामध्ये महाप्रसादाचे वाटप करताना दिसून आले. 

विसर्जन घाटावरील अल्पोपहाराचे वाटप असो किंवा किसननगर परिसरातील पुजेचा कार्यक्रम या ठिकाणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट हातात चमचे घेऊन येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटपच सुरू केले. 

साधारण तीन दिवसांच्या काळात चार ते पाच ठिकाणी त्यांनी प्रसाद वाटपामध्ये भाग घेतल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रसाद मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दीच उसळू लागली होती. त्यामुळे सेल्फी घेणाऱ्या मंडळींना आयती संधी मिळून आली होती.

कोपरी येथील विसर्जन घाटावर पोहचलेले शिंदे यांनी आपला मोर्चा अल्पोपहार वाटप टेबलाच्या दिशेने वळवला आणि तेथील पोहे आणि वडापाव नागरिकांच्या ताटामध्ये वाढण्यास सुरूवात केली.

तर किसननगर परिसरामध्ये झालेल्या पुजेच्या दरम्यान पालकमंत्र्यांनी थेट महाप्रसाद वाटपाच्या ठिकाणी उपस्थित राहून येणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटप सुरू केला. शिंदे यांच्या मदतीला त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेही आल्यानंतर सगळ्यांनीच या महाप्रसादाच्या वाटपाला हातभार लावला. 

संबंधित लेख