Thane is the biggest Constituency in the State | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

ठाणे मतदारसंघ राज्यात सर्वांत मोठा; दक्षिण-मध्य मुंबई सर्वांत लहान

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 मार्च 2019

राज्यातील अनेक मतदारंघांत मतदारसंख्या कमी अधिक प्रमाणात होती. म्हणजेच काही मतदारसंघात अगदी कमी आणि काही ठिकाणी मोठया प्रमाणात मतदार होते. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने 2009 मध्ये सर्व मतदारसंघांची फेरचना केली. या फेरचनेच्या आधारे सध्याच्या निवडणुका होत आहेत. मतदार संख्येच्या पातळीवर विचार केला असता राज्यात ठाणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा धामधूम सुरू झाली असून निवडणूक आयोग आणि सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या सदंर्भात प्रशासन आणि पक्षांच्या पातळीवर प्रत्येक मतदारसंघांचा आढावा घेणे सुरू असताना राज्यातील 48 मतदारसंघांपैकी सर्वांत मोठा मतदारसंघ ठाणे आणि लहान मतदारसंघ दक्षिण-मध्य मुंबई असल्याने त्या दृष्टिने राजकीय पक्ष आणि प्रशासन अशा दोन्ही पातळीवर निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.

यापूर्वी राज्यातील अनेक मतदारंघांत मतदारसंख्या कमी अधिक प्रमाणात होती. म्हणजेच काही मतदारसंघात अगदी कमी आणि काही ठिकाणी मोठया प्रमाणात मतदार होते. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने 2009 मध्ये सर्व मतदारसंघांची फेरचना केली. या फेरचनेच्या आधारे सध्याच्या निवडणुका होत आहेत. मतदार संख्येच्या पातळीवर विचार केला असता राज्यात ठाणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार असून दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात सर्वात कमी मतदार आहेत. ठाण्यापाठोपाठ राज्यातील मावळ, नागपूर, शिरूर, बारामती,बीड, आणि पुणे मतदारसंघात मतदारसंख्या अधिक आहे.

राज्यातील एकूण मतदार - 8 कोटी 73 लाख 484
ः- ठाणे - 23 लाख 7 हजार 232
ः- मावळ - 22 लाख 27 हजार 133
ः- नागपूर - 21 लाख 26 हजार 574
ः- शिरूर - 21 लाख 11 हजार 465
ः- बारामती - 20 लाख 77 हजार 278
ः- बीड - 20 लाख 28 हजार 339
ः- पुणे - 20 लाख 24 हजार 731
ः- दक्षिण-मध्य मुंबई - 14 लाख 15 हजार 605

संबंधित लेख