thakare uddhav and rammandir | Sarkarnama

अयोध्येत हाय अलर्ट जारी - शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था, ठाकरे अयोध्येकडे रवाना

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

मुंबई / प्रयागराज : शिवसेना आणि विश्‍व हिंदू परिषद यांचे अयोध्येतील संभाव्य कार्यक्रम लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने हाय अलर्ट जारी केला अशून अयोध्येत कडेकोड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यातआली आहे. महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक येथे दाखल झाले असून दुपारनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे विशेष विमानाने अयोध्येकडे रवाना झाले आहेत. 

विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीनेही उद्या रविवारी अयोध्येत मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन कार्यक्रमांमुळे अयोध्येत कुठलाही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी प्रशासन सज्ज असून केंद्रीय गृहमंत्रालय आणि उत्तर प्रदेश पोलिस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठिकठिकाणी ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. अयोध्या शहराला लष्करी छावणीचे रुप आले आहे. 

संबंधित लेख