thakare and shivsena and raj | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

...त्यांनी केलं की मुत्सदेगिरी आणि आमची गद्दारी व घोडेबाजार कसा - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर बोलवलेल्या खास पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अत्यंत आक्रमक शैलीत ठाकरे यांनी आज पत्रकारांच्या प्रश्‍नांला उत्तर दिले. नांदेडमधील कॉंग्रेसच्या विजयाबद्दल त्यांनी अशोक चव्हाण यांचे अभिनंदन केले आणि जनतेने दिलेल्या कौलाचा आम्ही स्वीकार करतो असेही सांगितले. नांदेडच्या जनतेला जर अशोक चव्हाण आपल्या शहराचा विकास करतील अशा विश्‍वास वाटत असेल तर ते खुल्या मनाने स्वीकारले पाहिजे अशीही टिपणी त्यांनी केली.

मुंबई : आम्ही आमचा पक्ष बळकट करत आहोत दुसऱ्या पक्षातून स्वतःहून येणाऱ्या नगरसेवकांना आम्ही आमच्या पक्षात घेतले आहे, आमच्यावर टीका करणाऱ्या पक्षांनी गोवा आणि अरुणाचल प्रदेश तसेच आणि अन्य राज्यात काय केले असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता केला. दुसऱ्या पक्षातून आलेल्या सदस्यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतल्यावर त्यांची ती मुत्सदेगिरी आणि आम्ही तसेच केले की ती गद्दारी याचा अर्थ कसा लावायचा असा सवालही उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला केला. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर बोलवलेल्या खास पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अत्यंत आक्रमक शैलीत ठाकरे यांनी आज पत्रकारांच्या प्रश्‍नांला उत्तर दिले. नांदेडमधील कॉंग्रेसच्या विजयाबद्दल त्यांनी अशोक चव्हाण यांचे अभिनंदन केले आणि जनतेने दिलेल्या कौलाचा आम्ही स्वीकार करतो असेही सांगितले. नांदेडच्या जनतेला जर अशोक चव्हाण आपल्या शहराचा विकास करतील अशा विश्‍वास वाटत असेल तर ते खुल्या मनाने स्वीकारले पाहिजे अशीही टिपणी त्यांनी केली. 

आम्ही त्यांचा पक्षा फोडलेला नाही त्यांच्या पक्षातील सदस्यांना आम्ही आमच्या पक्षात घेतलेले नाही, जर आमचे बळ वाढत असेल तर खरेतर आमच्या मित्रपक्षाला आनंद वाटायाला हवा आमच्या सुखात त्यांनी आनंद मानला पाहिजे आम्हाला सुख मिळालं तर खरं तर आमच्या मित्रपक्षाच्या पोटात दुखता कामा नये असा टोलाही त्यांनी यावेळी मारला, त्याचबरोबर किरीट सौमैय्या यांनी शिवसेनेवर घोडेबाजार केल्याचा आरोप केला होता त्याबद्दल प्रश्‍न विचारल्यावर ठाकरे म्हणाले, " घोडेबाजाराबद्दल गाढवांनी बोलू नये. ' 

संबंधित लेख