thakare and rammandir | Sarkarnama

शरयुकाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून महाआरती

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

अयोध्या : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अयोध्येतील शरयुकाठी मंत्रघोषात पुजा व महाआरती केली. यावेळी हजारो शिवसैनिक उपस्थित होते. आरतीसाठी ठाकरे यांचे शरयु नदीकाठी मोठ्या थाटात आगमन झाले. त्यांच्यासमवेत रश्‍मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत व मंत्री एकनाथ शिंदे, औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. ठाकरे याचे शरयुकाठी आगमन होण्यापूर्वी जय भवानी, जय शिवाजी, आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणा देण्यात येत होत्या. मार्गावर उभारलेले भगवे झेंडे आणि पोस्टर यामुळे इथले वातावरण शिवसेनामय झाले होते. 

ठाकरे यांचे आज दुपारी अयोध्येत आगमन झाल्यावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दुपारी त्यांनी लक्ष्मण किल्ला येथे भेट दिली., तिथे त्यांचे भाषणही झाले राम मंदिर बांधण्यासाठी सरकारने निश्‍चित तारीख द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. ठाकरे यांच्या या दौऱ्याची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसेनेचे नेते व शिवसैनिक चार दिवस आधी आले होते. लक्ष्मण किल्ला ते शरयु नदीकाठी येण्याचे अंतर अर्धा किलोमीटर आहे या मार्गावर सगळीकडे रेड कार्पेट व फुलाच्या पाकळ्या टाकण्यात आल्या ेहोत्या. 

संबंधित लेख