thakare and maratha reservation | Sarkarnama

घटनादुरुस्तीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

मुंबई : राज्यात सध्या निर्माण झालेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तातडीने विधिमंडळाचे अधिवेशन बोलवावे तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यासाठी ठराव करून तो केंद्राकडे पाठवावा अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे अशी शिवसेनेने भूमिका घेतली आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पहाता मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

राज्यात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण खूपच तापले आहे. या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदरांची बैठक आज सकाळी मातोश्रीवर बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. आज दुपारी 4 वाजता शिवसेनेचे नेते व मंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख