thakare and bjp | Sarkarnama

महाराष्ट्रात राष्ट्रीय पक्षांची मस्ती चालू देणार नाही - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पंढरपूर : देशात ज्या पाच राज्यात निवडणुका झाल्या त्यापैकी मिझोराम आणि तेलंगणा या दोन राज्यात राष्ट्रीय पक्षांना पूर्णपणे नाकारण्यात आले, या दोन राज्यातील जनतेने राष्ट्रीय पक्षांची मस्ती आम्ही चालू देणार नाही हाच संदेश दिला आहे, तोच संदेश आपल्या शिवरायाच्या महाराष्ट्राने द्यायला हवा असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये केले. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांनी अनेक प्रश्‍नांना हात घातला. 

भाषणाची सुरवात करताना त्यांनी नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांचा संदर्भ दिला. ते म्हणाले या पाच राज्यात तोंड दाखवायला जागा राहिली नाही असा दणका भारतीय जनता पक्षाला तिथल्या जनतेने दिला आहे. भाजपचा या पाच राज्यात सुपडा साफ झाला असून त्यांच्या ठिकऱ्या उडवल्या आहेत. मी पंढरपूर नंतर आता वाराणसीला जाणार अशाही बातम्या दिल्या गेल्या, मी जाईनही तिथे, देशभरात मी कुठेही जाईन. पण मी तुम्हाला सांगतो मी अयोध्येत गेलो तो कुंभकर्णाला जागे करण्यासाठी, अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी आमची बांधिलकी कायम आहे, अयोध्येत राममंदिर उभारणारच. राफेल विमानाच्या व्यवहाराचा उल्लेख करून त्यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. पहारेकरीच चोर असल्याचा आरोप करून त्यांनी राफेलच्या मुद्यावर भाजपवर घणाघाती टीका केली. 

संबंधित लेख