उद्धव ठाकरेंबद्दल अयोध्यावासियांमध्ये उत्सुकता, जंगी स्वागताची तयारी

उद्धव ठाकरेंबद्दल अयोध्यावासियांमध्ये उत्सुकता, जंगी स्वागताची तयारी

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अयोध्यावासियांमध्ये प्रचंड उत्सूकता निर्माण झाली आहे. संपूर्ण अयोध्या भगवी झाली असून ठिकठिकाणी भगवे ध्वज, स्वागताचे फलक आणि फटाक्‍यांच्या आतषबाजीची तयारी स्थानिक नागरिक व शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. अयोध्येत प्रथमच येणाऱ्या उध्दव ठाकरे यांचे न भूतो न भविष्यती असे जंगी स्वागत होणार असल्याचा दावा या दौऱ्याचे समन्वयक व औरंगाबाद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना केला. 

अनेक चर्चा आणि अफवांचा प्रसार उध्दव ठाकरे यांच्या आयोध्या भेटीच्या निमित्ताने केला जातोय. पण त्याचा कुठलाही परिणाम शिवसेनेच्या नियोजित कार्यक्रमांवर होणार नसल्याचा पुनरुच्चार देखील दानवे यांनी केला आहे. पक्षप्रमुखांचे आयोध्या आगमन दोन दिवसांवर आलेले असतांना उत्तर प्रदेशातील 74 ते 80 जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मदतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. 

महाराष्ट्राच्या विविध भागातून पाच ते दहा हजार शिवसैनिक अयोध्येत उद्यापर्यंत दाखल होण्याची शक्‍यता आहे. या सर्वांची आयोध्येतील विविध आखाड्यांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. 
आखाडे, संत-महंत, पुजाऱ्यांना निमंत्रण 
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे 24 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता अयोध्येत आगमन होणार आहे. सर्वप्रथम संत-महतांचे उद्धव ठाकरे यांना आर्शिवचन पर मार्गदर्शन होणार आहे. आर्शिवचन झाल्यानंतर लक्ष्मण किला येथेच उध्दव साहेब देशभरातून आलेल्या शिवसैनिकांशी जनसंवाद साधतील. सांयकाळी शरयू नदीचे पूजन आणि महाआरती होणार आहे. या सर्वच कार्यक्रमांचे रितसर निमंत्रण संत-महंत, स्थानिक आखाड्यांचे प्रमुख आणि पुजाऱ्यांना शिवसेना नेत्यांनी प्रत्यक्ष जाऊन दिले आहे. आणि ते सर्वच या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे रामलल्ला मुर्तींचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत. पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे मुंबईकडे रवाना होतील अशी माहिती देखील अंबादास दानवे यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com