thakare and 31 event | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

उध्दव ठाकरे 31 डिसेंबरसाठी कुटुंबियांसह महाबळेश्‍वरमध्ये

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 डिसेंबर 2018

महाबळेश्‍वर येथील अधिवेशनानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखपदाची जबाबदारी सोडली होती. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार म्हणुन पक्षात उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांची नावे स्पर्धेत होती मात्र, पक्षाध्यक्षपदपदाची जबाबदारी उध्दव ठाकरे यांच्या गळात पडली ती महाबळेश्‍वर येथील विशेष अधिवेशनातच. त्यामुळे शिवसेनेच्या इतिहातसात महाबळेश्‍वर शहरास अनन्य साधारण महत्व आहे. 

महाबळेश्‍वर : दरवर्षीच्या प्रथेनुसार नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे पत्नी रश्‍मी ठाकरे व चिरंजीव युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि निवडक नातेवाईकांसह महाबळेश्‍वर मध्ये दाखल झाले आहेत. प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांच्या फोर ओक्‍स बंगल्यात त्यांचे वास्तव्य आहे. सध्या महाबळेश्वर गुलाबी थंडीने गोठले असून गेल्या चार दिवसांपासून वेण्णालेक परिसरात दवबिंदु गोठले आहेत. ठाकरे कुटुंबीय येथे वास्तव्यास आले असल्याने सर्वांचे लक्ष आता महाबळेश्वरकडे लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाकरे कुटुंबीय नवीन वर्ष्याच्या स्वागतासाठी महाबळेश्वरला येतात. 

या मागे एक विशेष कारणही सांगितले जाते. 2001 मध्ये महाबळेश्‍वर येथील हॉटेल ड्रीमलॅण्डच्या सभागृहात शिवसेनेचे विशेष अधिवेशन झाले होते. या अधिवेशनास पक्षांतील सर्व नेते उपस्थित होते. महाबळेश्‍वर येथील अधिवेशनानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखपदाची जबाबदारी सोडली होती. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार म्हणुन पक्षात उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांची नावे स्पर्धेत होती मात्र, पक्षाध्यक्षपदपदाची जबाबदारी उध्दव ठाकरे यांच्या गळात पडली ती महाबळेश्‍वर येथील विशेष अधिवेशनातच. त्यामुळे शिवसेनेच्या इतिहातसात महाबळेश्‍वर शहरास अनन्य साधारण महत्व आहे. 

उध्दव ठाकरे यांचे महाबळेश्‍वरवर विशेष प्रेम आहे ते त्यामुळेच. ठाकरे हे सहकुटुंब महाबळेश्‍वर येथे येतात. वर्षातून एकदा तरी ते महाबळेश्‍वर येथे विश्रांतीसाठी येतात. त्यानुसार उद्धव ठाकरे व त्यांचे कुटुंबीय तीन दिवसांच्या विश्रांतीसाठी महाबळेश्वरला आले आहेत. सध्या त्यांचा मुक्काम उद्योगपती अविनाश भोसले यांच्या फोरओक्‍स या बंगल्यात आहे. हा दौरा खासगी असल्याने कोणीही शिवसेना पदाधिकारी त्यांच्यासोबत नसल्याचे सांगितले जात आहे. आगामी निवडणुकात शिवसेनेने स्वबळाचे शस्त्र उपसले आहे. त्यासाठी लागणारी उर्जा ते या विश्रांतीदरम्यान मिळवणार आहेत. या तीन दिवसात ठराविक जवळच्या मित्रांव्यतिरिक्त ते कोणालाही भेटणार नाहीत असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

 

संबंधित लेख