tension in kolhapur | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मराठा मोर्चा कार्यकर्त्यांना अटक केल्याने कोल्हापुरात तणाव

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर : मुंबई येते मराठा संवाद यात्रेसाठी जाणाऱ्या दहा कार्यकर्त्‍यांना आज कोल्हापुरात अटक करण्यात आली.  त्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आल्याने मराठा कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

`सकल मराठा`च्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे सकल मराठा च्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होत आहे. या कार्यकर्त्यांना तात्काळ सोडावे या मागणीसाठी दसरा चौक येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे 

उद्या मुंबई येथे मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापुरातून मुंबई येथे गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे या आंदोलनाच्या  पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी प्रमुख कार्यकर्त्यांना अटक केली आहे.  उद्या मुंबईत मराठा समाजाची संवाद यात्रा धडकणार होती. त्यासाठी शेकडो शेकडो गाड्या मुंबईत दाखल होणार होत्या.

प्रतिबंधात्मक कारवाई दाखवून पोलिसांनी 10 मराठा कार्यकर्त्यांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. अटक केलेल्यामध्ये दिलीप देसाई, इंद्रजित सावंत यांचा समावेश आहे.  आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मराठा आंदोलनकर्ते करत आहेत.

संबंधित लेख