tense in chafal due to rohan todkar death | Sarkarnama

मराठा तरुण रोहन तोडकरच्या मृत्यवरुन चाफळमध्ये तणाव; जिल्हाधिकारी पोहचल्या! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

सातारा : कोपेरखैरणे येथे मराठा आरक्षण आंदोलनावेळी झालेल्या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या पाटण तालुक्‍यातील चाफळ खोणोली येथील रोहन तोडकर याचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे. मृतदेह घेऊन आलेली शववाहिका चाफळ येथे थांबविण्यात आली असून मोठ्याप्रमाणात युवकांचा जमाव तेथे जमला आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी तेथे येऊन मृताच्या वारसांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन द्यावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल तिथे दाखल झाल्या आहेत. 
आमदार शंभूराज देसाई, पोलीस अधोक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी तसेच पोलीस अधोकारी व कर्मचारी ही चाफळ मध्ये उपस्थित आहेत. 

रोहन तोडकर हा मुंबईत रिलायन्स जिओ मध्ये कामा ला होता. कोपेरखैरण येथे मराठा आरक्षण मोर्चा वेळी झालेल्या हिंसक आंदोलनात रोहनचा मृत्यु झाल्याचे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत. शासनाकडून रोहनच्या नातेवाईकांना मदत देण्याचे आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह खोणोली कडे नेण्यास त्याच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे. चाफळ येथून सुमारे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख