telangana dessole chandrashekhar rao | Sarkarnama

तेलंगण विधानसभा विसर्जित, के. चंद्रशेखरराव यांचा निर्णय

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

हैदराबाद : वेगळ्या तेलंगणचा मंगलकलश आणणारे "तेलंगण राष्ट्रसमिती'चे (टीआरएस) सर्वेसर्वा आणि विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी आज राज्याची पहिली विधानसभा मुदतीपूर्वीच विसर्जित करून सर्वांनाच धक्का दिला. यामुळे आता राज्यात लवकर विधानसभा निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

हैदराबाद : वेगळ्या तेलंगणचा मंगलकलश आणणारे "तेलंगण राष्ट्रसमिती'चे (टीआरएस) सर्वेसर्वा आणि विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी आज राज्याची पहिली विधानसभा मुदतीपूर्वीच विसर्जित करून सर्वांनाच धक्का दिला. यामुळे आता राज्यात लवकर विधानसभा निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

येथे दुपारी प्रगती भवनात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विधानसभा विसर्जित करण्यासंबंधीचा केवळ एका ओळीचा ठराव मंजूर करण्यात आला. 
राज्य मंत्रिमंडळाचा हा प्रस्ताव राज्यपाल पी.एम.एल. नरसिंहन यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला असून, त्यांनीही तो स्वीकारला आहे. आता ते राज्याचे केवळ काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. 

तब्बल नऊ महिनेआधीच चंद्रशेखरराव यांनी विधानसभा विसर्जित केल्याने राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे, मागील आठवडाभरापासून चंद्रशेखरराव यांच्या भावी राजकीय वाटचालीबाबत माध्यमे आणि राजकीय वर्तुळातही मोठी उत्सुकता होती. दरम्यान, तेलंगणमधील विधानसभा निवडणूक आधी घ्यायची की डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या अन्य चार राज्यांच्या निवडणुकांसोबत घ्यायची याचा अंतिम निर्णय शेवटी निवडणूक आयोगच घेणार आहे. 

कॉंग्रेसचा प्रचार 
तेलंगणमधील निवडणुकीबाबत अनिश्‍चितता असली तरीसुद्धा शासकीय पातळीवर मात्र याआधीच तयारी झाल्याचे बोलले जाते. राज्यातील बड्या अधिकाऱ्यांनी मध्यंतरी या अनुषंगाने मुख्य निवडणूक आयुक्तांची दिल्लीत भेटही घेतली होती. खुद्द के. चंद्रशेखरराव हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य केंद्रीय मंत्र्यांना भेटले होते. राज्यात कॉंग्रेसने अन्य विरोधकांना हाताशी धरून "टीआरएस'विरोधात वातावरण तापवायला सुरवात केली होती. खुद्द पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीच राज्यात लक्ष घातल्याने सत्ताधारी पक्षाच्या चिंता वाढल्या होत्या. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख