tejpratap yadav divorce story | Sarkarnama

माझ्या निर्णयाला घरचे जोपर्यंत पाठिंबा देत नाहीत तोपर्यंत घरी परतणार नाही, तेजप्रताप यादवांची भिष्मप्रतिज्ञा 

वृत्तसंस्था
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

मथुरा : जोपर्यंत ऐश्‍वर्या राय यांना घटस्फोट देण्याच्या माझ्या निर्णयाला घरचे पाठिंबा देत नाहीत तोपर्यंत मी घरी परतणार नाही अशी भिष्मप्रतिज्ञा राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसरा लालू प्रसाद यांचे ज्येष्ठ पूत्र तेजप्रताप यादव यांनी घेतली आहे. 

मथुरा : जोपर्यंत ऐश्‍वर्या राय यांना घटस्फोट देण्याच्या माझ्या निर्णयाला घरचे पाठिंबा देत नाहीत तोपर्यंत मी घरी परतणार नाही अशी भिष्मप्रतिज्ञा राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसरा लालू प्रसाद यांचे ज्येष्ठ पूत्र तेजप्रताप यादव यांनी घेतली आहे. 

गेल्या मे महिन्यातील बारा तारखेला तेजप्रताप आणि ऐर्श्‍वर्या यांचा विवाह मोठ्या धुमधडाक्‍यात झाला होता. मात्र सहा महिन्यातच या दोघांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर तेजप्रताप यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. तेजप्रताप यांच्या निर्णयाने यादव कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. लालू प्रसाद हे तुरूंगात आहेत. राज्यात सत्ता नाही. तेजप्रताप यांनी यापूर्वी क्रिकेट, चित्रपटक्षेत्रातही नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला पण, ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी वडलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात एन्ट्री केली खरी म्हण येथे ते जम बसवू शकले नाहीत. त्यांच्या लहान भाऊ तेजस्वी यादव यांनी पक्षाचा जवळजवळ ताबा घेतला आहे. 

तेजप्रताप यांनी काल मथुरा, वृंदावन राधाकुंड या धार्मिकस्थळांना भेट देऊन देवदर्शन घेतले. त्यानंतर हरिद्वार आले. दुरध्वनीवरून एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, की ऐश्‍वर्याशी घटस्फोट घेण्याचा माझा निर्णय अंतिम आहे. मी तिच्याबरोबर कधीच संसार करू शकत नाही. त्यामुळे माझ्या निर्णयाला घरच्यानी पाठिंबा दिला पाहिजे. जोपर्यंत ते पाठिंबा देत नाहीत तोपर्यंत मी घरी परतणार नाही. त्यांनी वृंदावनला गोवर्धन पुजा केली. 

दरम्यान, देवदर्शनानंतर ते दिल्लीकडे रवाना होणार असून तेथे आपले भाऊ तेजस्वी यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत. काही असले तरी तेजप्रताप यांच्या निर्णयाने राय-यादव कुटुंब चिंतेत आहेत. 
 

संबंधित लेख