टेक्‍नॉलॉजीचा असाही उपयोग : साथीदारांवरील अविश्वासपोटी हाती दिले स्कॅनर अन्‌ की-चेन

टेक्‍नॉलॉजीचा असाही उपयोग : साथीदारांवरील अविश्वासपोटी हाती दिले स्कॅनर अन्‌ की-चेन

बीड : एक एक मताला प्रचंड मोल आलेल्या लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पाठिंबा घेतलेल्या पक्षावर अविश्वास दाखवत त्यांच्या मतदारांच्या हाती स्कॅनर आणि की-चेन (ज्यातून कोणाला मतदान केले हे दिसेल) दिल्याचा प्रकार घडला. मतदानात अविश्वास दाखविला तर भविष्यात कसे असा प्रश्न आहे. 
लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली. 

दोन्ही पक्षांनी मत पदरात पाडून घेण्यासाठी विविध क्‍लृप्त्या लढविल्या. दरम्यान, एका पक्षाने आपल्या सहयोगी पक्षाचा पाठिंबा मिळविण्यासाठी मुंबईपासून तिन्ही जिल्ह्यांत प्रयत्न केले आणि पाठिंबा मिळाल्याचे जाहीरही केले. मात्र, मतदान करताना मात्र शंकेची पाल उमेदवार असलेल्या पक्षाच्या मनात चुकचुकली आणि त्यांनी सहयोगी पक्षाच्या मतदारांच्या हातात स्कॅनर आणि किचन दिले. मतदान केंद्रात नेलेल्या या वस्तुंमुळे कोणाला मतदान झाले हे स्पष्ट होणार होते. पण, तुम्ही अविश्वास दाखविणार असाल तर तुम्हाला मतदानच नाही असा पवित्रा काही ठिकाणी मतदारांनी घेतला. मात्र, आताच असा सहयोगी पक्षावर अविश्वास असेल तर आणखी निकाल लागणे बाकी असून भविष्यातही संसार कसा चालणार असा प्रश्न आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com